Sunday, February 16, 2025
Homeमुख्य बातम्या'या' कारणामुळे मित्रानेच केला होता मित्राचा खून

‘या’ कारणामुळे मित्रानेच केला होता मित्राचा खून

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सुमारे वर्षभरापूर्वी अपघात (accident) भासवून मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या विम्याचे ४ कोटी रुपये हडपण्यासाठी खून (murder) केल्याचा प्रकार मुंबईनाका पोलिसांनी उघडकीस आणला.

- Advertisement -

याबाबत सविस्तर वृत्त असे कि,(दि.२ सप्टेंबर २०२१) रात्री साडेतीन वाजेच्या दरम्यान इंदीरा नगर जॉगिंग ट्रॅक (jogging track) येथे अशोक सुरेश भालेराव (४६,रा. भगुर रोड, देवळाली कॅम्प) यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते जागीच ठार झाले होते. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर तब्बल वर्षभरानंतर मृत अशोक यांचा भाऊ दिपक भालेराव याने मुंबई नाका पोलीसांकडे (police) त्यांच्या भावाच्या मृत्युबाबत शंका व्यक्त करून पुन्हा तपास करण्याची विनंती केली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी पुन्हा तपास सुरु केला असता मृत अशोक यांचे मित्र असलेल्या संशयितांची बॅंक खाती (Bank accounts) तपासणी केली असता संशयित रजनी कृष्णदत्त उके, मंगेश बाबुराव सावकार, दिपक अशोक भारूडकर, किरण देविदास शिरसाठ, हेमंत शिवाजी वाघ व प्रणव राजेंद्र साळवे (सर्व रा. नाशिक) यांनी त्यांचा मित्र अशोक यांची ४ कोटी रुपयांच्या रकमेसाठी खून (murder) करून त्यापासून वाचण्यासाठी अपघाताचा (accident) बनाव केल्याचे निष्पन्न झाले.

यातील रजनी उके हिने मृत अशोक यांची पत्नी असल्याचे भासवत त्यांच्या पत्नीच्या नावाने बनावट बॅंक खाते तयार केले असल्याचे निष्पन्न झाले. याच घटनेतील मंगेश सावकार याच्याकडून विनापरवाना असलेली एक पिस्टल व ६ जिवंत काडतुस (live cartridge) हस्तगत करण्यात आले. संशयितांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना २० डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

हि कामगिरी पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त दिपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईनाका वरिष्ठ निरीक्षक सुनिल रोहोकले,पोलीस निरीक्षक चंद्रकांत अहिरे, सहाय्यक निरीक्षक किरण रोंदळे . उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पंकज सोनवणे, अंमलदार देविदास गाढवे, म्हैसधुणे.सागर जाधव,आकाश सोनवणे, भास्कर सदगीर, जुबेर सय्यद व गुन्हे शोध पथकाने केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या