Tuesday, April 29, 2025
Homeधुळेसोयाबीनचे कट्टे चोरणारी टोळी जेरबंद

सोयाबीनचे कट्टे चोरणारी टोळी जेरबंद

धुळे । dhule प्रतिनिधी

शहरानजीक असलेल्या अवधान औद्योगिक वसाहतीतील (Awadhan Industrial Estate)एका प्लॉटच्या शेडमध्ये ठेवलेले सोयाबीनचे (soybean thieves) कट्टे चोरणार्‍या टोळीला मोहाडी पोलिसांनी (Mohadi Police) 24 तासांच्या आताच जेरबंद (Imprisoned) केले. त्यांच्याकडून मालवाहू रिक्षा, दुचाकी, सोयाबीनचे कट्टे असा एकुण सव्वा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलिसांच्या या वेगवान कामगिरीचे पोलिस अधिक्षक संजय बारकुंड यांनी पत्रपरिषदत विशेष कौतुक केले.

- Advertisement -

VISUAL STORY : ५४ व्या वर्षीही या अभिनेत्रीने गुलाबी साडीत तापवलं वातावरणजळगावच्या म्हाळसेची ही आहे VISUAL STORY, स्टोरीत नथीचा नखरा करतोय सर्वाना घायाळ

अवधान एमआयडीसीतील जयदुर्गा इंडस्ट्रीजचे येथे दि.7 मे रोजी साफसफाईचे काम सुरू होते. त्यामुळे सोयाबीनचे 23 कट्टे हे प्लॉटच्या बाहेरील शेडमध्ये ठेवण्यात आले होते. ही संधी साधत अज्ञात चोरट्यांनी मालवाहू वाहनातून सोयाबीन भरलेले 63 हजार 250 रूपये किंमतीचे 23 कट्टे लंपास केले. जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी गुन्ह्याची उकल करण्याचे आदेश दिले.

VISUAL STORY : टॉपची बटणं खुली ठेवून यलो स्कर्टमध्ये प्रियंकाच्या कातील अदाPhotos #ग्रामस्थांनी पेटविले अवैध वाळूचे ट्रॅक्टर

त्यानुसार मोहाडी पोलीस ठाण्याचे सपोनि.भूषण कोते, सपोनि. प्रकाश पाटील, असई.अशोक पायमोडे, पोना. राहुल पाटील, पोकॉ.जितेंद्र वाघ, मुकेश मोरे, बापुजी पाटील, जयकुमार चौधरी यांचे पथक तयार करण्यात आले. पथकाने घटनास्थळावरील तसेच परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासाले. त्यात एक संशयित मालवाहू रिक्षा या परिसरातून जाताना दिसली. त्या अनुषंगाने तपासाची चक्रे फिरवली.

VISUAL STORY : आज आहे या लिंबु कलर अभिनेत्रीचा वाढदिवस… करिअरच्या यशोशिखरावर असतांनाच लग्न करून झाली अमेरीकेत सेटल

हा गुन्हा रवी यशवंत मालचे (वय 30), करण शांताराम सोनवणे (वय 19), नवनाथ महादू सोनवणे (वय 35) तिघे रा.दिवाणमळा, ता.धुळे, सोमनाथ राजु सोनवणे (वय 30), आकाश सुकदेव ठाकरे (वय 20) दोघे रा.लळींग व दगा रामदास पवार (भिल-26) रा.जुन्नेर, ता.धुळे यांनी केल्याचे निष्पन्न झाले. त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

त्यांच्याकडून 60 हजार रूपये किंमतीची मालवाहू रिक्षा (क्र.एम.एच.18/बी. एच.0869), 30 हजार रूपये किंमतीची दुचाकी (क्र. एम.एच.18/सी.ए.7236) व 41 हजार 250 रूपये किंमतीचे 25 सोयाबिनचे कट्टे असा एकूण 1 लाख 31 हजार 250 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हॉटेल कामगार खुनप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह चौघांना अटक

ही कामगिरी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहा. पोलिस अधिक्षक एस.ऋषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.

विवाह सोहळ्यात नजर हटताच तीन लाखांची पर्स लांबविली

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी पाकिस्तानचा माजी ‘पॅरा कमांडो’

0
दिल्ली । Delhi २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे भीषण दहशतवादी हल्ला झाला. पाच ते सहा दहशतवाद्यांनी पर्यटनासाठी आलेल्या लोकांवर अचानक गोळीबार केला....