Saturday, July 27, 2024
Homeनाशिक'देशदूत पंचवटी प्रॉपर्टी एक्स्पो'ला शानदार सुरुवात

‘देशदूत पंचवटी प्रॉपर्टी एक्स्पो’ला शानदार सुरुवात

नाशिक । प्रतिनिधी Nashik

उत्तम दर्जा, सुयोग्य स्थान, भरपूर सुविधा आणि वाजवी मूल्य या चतु:सूत्रीचा संगम साधलेल्या गृहप्रकल्पांचा अंतर्भाव असलेल्या ’देशदूत’ आयोजित तसेच ललित रुंगटा ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायोजित ‘पंचवटी प्रॉपर्टी एक्स्पो 2023’ प्रदर्शनाचा शानदार शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

- Advertisement -

माजी नगरसेवक अरुण पवार, जगदीश पाटील, बँक ऑफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर सी. बी. सिंह, हणमंते बिल्डर्सचे संचालक हर्षल हणमंते आदी मान्यवरांच्या उपस्थितीत फीत कापून एक्स्पोचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रम सुरू झाला. ‘देशदूत’च्या संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी प्रास्ताविक केले. पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

प्रदर्शनाचे आयोजन पंचवटी येथील एस. एल. के. प्रॉपर्टीज, राज स्वीट्ससमोर, आरटीओ कॉर्नर, दिंडोरी रोड येथे करण्यात आले आहे. त्यात नामांकित बांधकाम व्यावसायिक आणि तत्सम असे 30 स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. मान्यवरांनी प्रदर्शन आयोजनाबाबत सामान्य नागरिक व बांधकाम व्यावसायिक यांच्यात विश्वासार्हतेचा सेतू निर्माण करणार्‍या ‘देशदूत’ परिवाराचे कौतुक केले. तसेच स्टॉलला भेट देत स्टॉलधारकांशी संवाद साधला. प्रदर्शन येत्या रविवारपर्यंत (दि. 10) दुपारी 2 ते रात्री 9 या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. गृहस्वप्नपूर्तीसाठी नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

पहिल्याच दिवशी नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी दै. ‘देशदूत’चे जाहिरात व्यवस्थापक मिलिंद वैद्य, जाहिरात व्यवस्थापक (ग्रामीण) सचिन कापडणे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मार्केटिंग ऑफिसर समीर पाराशरे, भगवंत जाधव, आनंद कदम, विशाल जमधडे यांनी परिश्रम घेतले. रवींद्र केडीया यांनी सूत्रसंचालन केले तर आभार जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे यांनी मानले.

‘देशदूत’ प्रॉपर्टी एक्स्पोचे मुख्य प्रायोजक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक ललित रुंगटा ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर सहप्रयोजक हर्षल हणमंते बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रा. ली. हे आहेत. तसेच फायनान्शिअल पार्टनर बँक ऑफ महाराष्ट्र आहे. 10 डिसेंबर पर्यंत दररोज दुपारी 2 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्वांना प्रवेश खुला आहे. नागरिकांनी ‘देशदूत’ आयोजित पंचवटी प्रोपर्टी एक्स्पोला अवश्य भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

‘देशदूत’ने प्रदर्शनाचे आयोजन अतिशय उत्तम प्रकारे केले असून पंचवटी परिसरातील अनेक गृह व व्यावसायिक प्रकल्पांची माहिती याद्वारे ग्राहकांना निश्चितच मिळण्यास मदत होईल. नागरिकांनी त्याचा जरूर फायदा घ्यावा.

– हर्षल हणमंते

अनेक बांधकाम व्यावसायिकांना व्यासपीठ मिळाले असून, हक्काचे घर घेणार्‍या नागरिकांना यानिमित्ताने उत्तमोत्तम आणि बजेट नुसार घर निवडण्याची संधी प्राप्त झाली आहे. ग्राहकांना या प्रदर्शनाचा नक्कीच फायदा होणार आहे. ‘देशदूत’च्या माध्यमातून होणारा हा उपक्रम प्रशंसनीय असा आहे.

– अरुण पवार

पंचवटीकडे व्यावसायिकदृष्ट्या सकारात्मक दृष्टीने बांधकाम व्यावसायिक बघत आहेत ही निश्चितच चांगली गोष्ट आहे. या एक्स्पोच्या माध्यमातून सर्व स्तरातील ग्राहकांना घर व व्यावसायिक प्रकल्प घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे त्याचा निश्चितच ग्राहकांनी फायदा घ्यावा.

– जगदीश पाटील

- Advertisment -

ताज्या बातम्या