Saturday, June 15, 2024
Homeनाशिकनाशिक रोड भागातील बारदान गोदामाला भिषण आग

नाशिक रोड भागातील बारदान गोदामाला भिषण आग

नाशिक रोड | प्रतिनिधी

- Advertisement -

नाशिक रोड परिसरात असलेल्या सुभाष रोड येथील बारदानाच्या लाकडी गोदामाला भिषण आग लागल्याची घटना घडली आहे. सोमवारी (०५) सकाळी ९.४५ ते १० वाजेच्या सुमारास ही आग लागली आहे. या आगीमध्ये गोदामासह शेजारील ९ दुकानांना ही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे.

बारदान गोदामाला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु असून अग्निशमन दलाचे १६ बंब घटनास्थळी दाखल झाले आहे. आगीमध्ये लाखो रुपयांच्या मालाचे नुकसान झाले आहे. आग भीषण असली तरी सुदैवाने यात जीवित हानी झालेली नाही. आग लागलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी जमा झाल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून आग विझवण्याचे शर्थिचे प्रयत्न सुरु आहे.

सविस्तर बातमी थोड्या वेळात

- Advertisment -

ताज्या बातम्या