मुंबई | Mumbai
पुण्यातील कोंढव्याजवळील गंगाधाम परिसरातील (Gangadham) आईमाता मंदिराजवळ भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. गाधाम सोसायटीच्या जवळ असलेल्या काकडे वस्तीत जवळपास तीन एकर परिसरामध्ये ही आग पसरली असून या आगीमुळे परिसरात धुराचे लोळ दूरपर्यंत पसरले आहेत….
येथील एका गोडाऊनला भीषण आग (Godown On Fire) लागली असून घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून वाहने घटनास्थळी दाखल करण्यात आली आहेत. आज सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास ही आग लागली असून या आगीने रौद्ररूप धारण केले आहे. यामुळे परिसरातील काही इमारती खाली करण्याचा सूचना प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. ही आग इतकी भीषण आहे की जवळपास २० अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
दरम्यान, या भागात विविध प्रकारचे गोडाऊन असून त्यातील ३ गोडाऊनला ही आग लागली आहे. तसेच आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.