Friday, September 20, 2024
Homeनाशिकवादातून पतीने पत्नीला विहिरीत ढकलले; पत्नीचा मृत्यू

वादातून पतीने पत्नीला विहिरीत ढकलले; पत्नीचा मृत्यू

नामपूर । वार्ताहर  Nampur

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील खिरमांनी येथील शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या दाम्पत्यातील वाद विकोपाला गेल्याने पती देविदास महादू भदाने याने पत्नी योगिता उर्फ अंजनाबाई देविदास भदाणे (वय ३५) हिला आपल्या शेतातील विहिरीत नेऊन ढकलून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

दरम्यान सायंकाळी विहिरीत मृतदेह दिसून आला, त्यानंतर सदर महिलेचा मृतदेह नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदनासाठी आणण्यात आला होता. यावेळी घटनेची माहिती मिळताच नामपूर ग्रामीण रुग्णालय मोठ्या प्रमाणत गर्दी झाली होती. रात्री उशिरापर्यंत  मृतदेह ताब्यात घेण्यावरून माहेरकडील मंडळी व सासरकडील मंडळी यांच्यात वाद सुरू होते. अखेर बारा वाजेच्या सुमारास मृतावर अंत्यसंस्कार करण्यात आले .

याबाबत जायखेडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी सासरे महादू दगा भदाणे, दीर प्रवीण महादू भदाणे दीर प्रवीण महादू भदाणे, दीरांनी पूनम प्रवीण भदाणे, सासू सगुणाबाई महादू भदाणे, सर्व राहणार खिरमनी यांच्यावर भांदवी कलम 103(2),85,3(5) प्रमाणे जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मयत योगिता यांच्या पश्चात एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

दरम्यान, सदर गुन्ह्याची माहिती मिळताच घटनास्थळी दंगा नियंत्रण पथक हजर होते. तसेच उपविभागीय अधिकारी मालेगाव ग्रामीण नितीन गणापूरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ, पोलीस उपनिरीक्षक संजय वाघमारे, संदीप चेडे आदींनी तात्काळ घटनास्थळाला भेट दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ करत आहेत. 

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या