Sunday, December 15, 2024
Homeनगरबिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळला

बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळला

भाळवणी | प्रतिनिधी

पारनेर (Parner) तालुक्यातील वडगाव आमली (Vadgoan Amali) परीसरात गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्याचा (Leopard) वावर असून ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून (Forest Department) पिंजरा लावण्यात आला आहे. मात्र बिबट्याला पकडण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना (staff of the forest department) अद्यापही यश मिळाले नसतानाच मंगळवारी येथील एका विहिरीत बिबट्याचा बछाडा मृतावस्थेत (leopard found dead in a well) आढळून आला.

- Advertisement -

तालुक्यातील वडगाव आमली परीसरातील नदीकाठी असलेल्या डेरे मळा (Dere mala) व पवार वस्ती (Pawar Vasti) या भागात कडवळ व उसाचे पीक असल्याने लपनक्षेत्र मोठया प्रमाणात असल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून येथे बिबटयाचे वास्तव्य आहे. दिवसाढवळ्या वस्तीवरील नागरीकांना बिबट्याचे (Leopard) दर्शन घडत असते. यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या मुगाची तोडणी सुरू आहे मात्र, बिबट्याच्या दहशतीमुळे (terror of leopards) शेतकरी (Farmers) वर्ग भितीच्या सावटाखाली आहे.

अकोलेकरांनी अनुभवला आगळावेगळा स्नेह समारंभ

या भागातील कोंबडया व कुत्रे बिबट्याने फस्त केले आहेत.बिबट्याला जेरबंद करण्यासाठी या भागात पिंजरा लावण्याची मागणी सरपंच अमोल पवार यांनी वन विभागाकडे केली होती. त्यानुसार पिंजरा लावूनही बिबट्याला पकडण्यात अद्यापही यश आलेले नाही. त्यामुळे नागरीकांच्या मनातील भितीचे वातावरण कायम आहे.

दरम्यान पवार वस्तीवरील एका विहिरीत उग्र व घाण वास येत असल्याने नागरीकांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना मृतावस्थेत असलेला बिबट्याचा बछाडा पाण्यात तरंगताना आढळून आला. याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाचे पथकही दाखल झाले. या मृत बछाड्याला विहिरीतून वर काढून त्याचे शवविच्छेदन करुन दहन करण्यात आले. विहिरी शेजारी दाट झाडे झुडपे असल्याने अंदाज न आल्याने बछडा विहिरीत पडला असल्याची शक्यता वनविभागाने व्यक्त केली. हा बछडा अंदाजे १ वर्ष वयाचा व नर जातीचा होता. या बछड्यामुळे या बिबट्याची मादी विहिरीभोवती घिरटया मारत होती अशी माहिती वनरक्षक एन.व्ही. बढे यांनी दिली. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सीमा गोरे , वनपाल पी.ए. रोडे उपस्थित होते.

दरम्यान बिबट्याची मादी बछड्यांसोबत असल्यानेच ती पिंजऱ्यात अडकत नव्हती मात्र आता बछडा मृत पावल्याने ही मादी आता या ठिकाणाहून स्थलांतर करील अशी शक्यता वनविभागाकडून व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या