Tuesday, March 25, 2025
Homeनाशिकमखमलाबाद शिवारात दिवसा बिबट्याचे दर्शन

मखमलाबाद शिवारात दिवसा बिबट्याचे दर्शन

पंचवटी | प्रतिनिधी Panchavati

मखमलाबाद शिवारातील गंगापूर कालव्या लगत असलेल्या शासनाच्या वनविभागाच्या नर्सरी परिसरात आता भर दिवसाही बिबट्या दर्शन देऊ लागल्याने परिसरातील शेतकरी व नागरिक आता चांगलेच दहशतीखाली आले आहेत.त्यामुळे आता तरी वन विभाग दखल घेईल का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.या परीसरात एक नव्हे तर नर मादी अन् दोन बछडे असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले.

- Advertisement -

मखमलाबाद शिवारातील गंगापूर कालव्या लगत परीसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर कायम असून रात्रीच्या वेळी बाहेर निघणारे बिबटे आता दिवसाही दिसू लागल्याचे चित्र आता दिसायला लागले आहेत.काही दिवसांपूर्वी काकड यांच्या मळ्यातील गोठ्यातील वासराचा देखील फडशा पाडला होता. या परिसरात गेले अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर कायम असल्याने परीसरात राहणारे शेतकरी, नागरिक आता चांगलेच दहशतीखाली आले आहे.

गंगापूर कॅनॉलला सकाळी आणि सायंकाळी शतपावली करण्यासाठी गंगापूर रोड तसेच परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर येत असतात. परंतु बिबट्याचा वावर असल्याने आता या भागात नागरिकांचा राबता कमी झाला आहे. त्यातच शनिवार (ता.२१) रोजी वाचनालयाचे संचालक प्रताप काकड यांच्या मळ्याकडे गंगापूर कॅनॉल रस्ताने त्यांचे पाहुणे सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान जात असताना त्यांना रस्त्यातच बिबट्याचे दर्शन घडले.त्यांनीही आपले वाहन थांबवत बिबट्याचे आपल्या मोबाईल मध्ये चित्रण केले. त्यामुळे त्यांनाही अगदी जवळून बिबट्या बघण्याचा अनुभव आल्याचे सांगितले. परंतू आता बिबट्या दिवसाही दिसू लागल्याने परिसरातील शेतकरी तसेच नागरिक दहशतीखाली आल्याने वनविभागाने याबाबत दखल घ्यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे .

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...