Sunday, October 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपिंपळगाव केतकी शिवारात बिबट्या जेरबंद

पिंपळगाव केतकी शिवारात बिबट्या जेरबंद

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

- Advertisement -

दिंडोरी तालुक्यातील पिंपळगाव केतकी शिवारात बिबट्याला जेरबंद करण्यात दिंडोरीच्या वनविभागाला यश आले आहे.

दिंडोरी तालुक्यात बिबट्यांनी दहशत निर्माण केली आहे. अनेक गावांमध्ये दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पिंपळगाव केतकी शिवारात अनेक दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत होते. याबाबत वनविभागाकडे या परिसरात पिंजरा बसविण्याची मागणी केली होती. वनविभागाने तत्काळ पिंजरा उपलब्ध करुन शितल फर्निचरचे संचालक भाऊसाहेब देशमुख यांच्या शेतात पिंजरा लावला होता.

या पिंजर्‍यात काल अडीच ते तीन वर्षीय मादी जातीचा बिबट्या अडकला. बिबट्या पकडला गेल्याने या भागातील नागरिकांनी सुटकेचा नि: श्‍वास टाकला आहे. अजून या परिसरात दोन ते तीन बिबटे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी आपल्या जनावरे गोठ्यात बांधावी, लहान बालकांना एकटे बाहेर पडू नये, रात्रीच्या वेळी बाहेर पडतांना बॅटरीचा वापर करावा. तसेच बिबट्या दिसल्यास त्वरीत वनविभागाशी संपर्क करावा, असे आवाहन दिंडोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुशांत पाटील, वनपाल अशोक काळे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : नोकरीचे आमिष दाखवून सहा लाखांची फसवणूक; म्हसरूळ...

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvti नोकरी (Job) मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची ६ लाख ४५ हजार ५३१ रुपयांची ऑनलाइन फसवणूक (Fraud) करणाऱ्या अट्टल सायबर...