Tuesday, November 19, 2024
Homeब्रेकिंग न्यूजविद्यार्थ्यांचा भरपावसात जीवघेणा प्रवास

विद्यार्थ्यांचा भरपावसात जीवघेणा प्रवास

प्रशासनाने वेळीच उपाय योजना करण्याची मागणी

- Advertisement -

इगतपुरी । वाल्मीक गवांदे Igatpuri


खैरेवाडी येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीव घेणा प्रवास करावा लागत असल्याचे चित्र पावसळ्यात समोर आले आहे. तालुक्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचा जोर वाढत असल्याने शिक्षणासाठी ही लहान मुले नदी नाले ओलांडून शाळेत जात असल्याने, ग्रामस्थांनी येथील समस्यांविरोधात प्रशासनाविरोधात तक्रारी केल्या आहेत.


परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रसार माध्यमांनी या वाडीवरील नागरिकांच्या समस्या अनेक वेळेस प्रशासनासमोर मांडल्या. परंतु कोणत्याही प्रकारची दखल अद्याप पर्यंत प्रशासनाने घेतली नाही. नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी देखील या वाडीला गेल्या वर्षी भेट दिली होती. परंतु अद्याप पर्यंत या नागरिकांच्या रस्त्याचा प्रश्न सुटलेला नाही. त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन काय उपाययोजना करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

गेल्या काही दिवसांपासुन सतंत मुसळधार पाऊस या भागात कोसळत असतांना सुद्धा येथील लहान मोठे विद्यार्थी पाठीवर दप्तराचे ओझे घेत कड्या कपारीतुन खडतर वाट शोधुन नदी नाल्यांतुन प्रवास करीत शाळेत जात आहेत. विशेष म्हणजे एखादा रूग्ण किंवा गरोदर महिलांना आणि वृद्धाला रूग्णालयात नेतांना डोली किंवा झोळी करून न्यावे लागत आहे. खडतर प्रवासाला कंटाळलेल्या ग्रामस्थांच्या समस्या सुटतील का अशी आर्त मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

केवळ वाड्या पाड्यावर जाऊन अधिकारी व लोकप्रतिनिधी फोटो शेषन व भाषणबाजी करून वेळ धकवुन नेतात काम मात्र तसेच प्रलंबीत राहते. या त्रासाला कंटाळलेल्या गावक-यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे पुन्हा प्रलंबीत कामे पुर्ण करा अशी मागणी केली असल्याची माहिती दिली.

पावसाचा वाढता जोर पाहता शिक्षण अधिकारी यांनी शालेय विद्यार्थांना सुट्टी जाहिर करावी व खैरे वाडीचा प्रलंबीत रस्ता त्वरीत बनविण्याचे आदेश द्यावे अशी मागणी या भागातील नागरीकांनी केली आहे. पावसाचा जोर कायम वाढत राहिला तर चिंचलेखैरे गावाचा शहराशी दळनवळणांचा संपर्क तुटेल यासाठी शासनाने वेळीच लक्ष द्यावे अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या