Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

नाशकात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

अन्न व औषध प्रशासन विभागाकडून (Food and Drug Administration) सूरक्षित अन्न पदार्थांसाठी धडक कारवाई हाती गेण्यात आली असून, या मोहीमेंतर्गत नाशिक तालुक्यासह (Nashik Taluka) नायगाव (Naigaon) येथे मोठी कारवाई करण्यात आली आहे…

- Advertisement -

एका आस्थापनातून एक कोटी 10 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे. सणासूदीच्या काळात ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाकडून शहरासह जिल्ह्यात धडक मोहीम राबवून कारवाई केली जात आहे. त्यामागे प्रामुख्याने सणासुदीच्या काळात जनतेला निर्भेळ अन्न (Food) मिळावे तसेच चांगल्या प्रतीचे खाद्यतेल (Edible Oil) मिळावे यावर विशेष लक्ष दिले गाणार आहे.

त्याअंतर्गत शिंदे गाव, नायगाव रोडवरील मेसर्स माधुरी रिफायनर्स प्रायव्हेट लिमिटेड या आस्थापनेवर धाड (Raid) टाकण्यात आली. या धाडीत विक्री होणार्‍या विविध प्रकारच्या सात खाद्यतेलांचे नमुने घेऊन कारवाई केली. त्यात 1कोटी 10 लाख 11 हजार 280 रुपये किमतीचा खाद्यतेल साठा जप्त केला आहे.

मविप्र निवडणूक : ‘प्रगती’चे जोरदार शक्तीप्रदर्शन, उमेदवारी अर्ज दाखल

दि. 1 ते 24 ऑगस्ट दरम्यान खाद्यतेल सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. नाशिक विभागात खाद्यतेलाचे 31 व वनस्पतीचे 1 असे एकूण 32 सर्वेक्षण नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

या सर्वेक्षण नमुन्यांचा विश्लेषण अहवाल प्राप्त होताच कमी दर्जाच्या खाद्यतेल विक्रेत्यांकडून नियमित अन्न नमुने घेऊन कायद्यांतर्गत पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

सांगा जगायचं तरी कसं? शेतात चार फुट पाणी, पावसानं सर्व काही हिरावून नेलं, पाहा व्हिडीओ…

अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त गणेश परळीकर (Ganesh Paralikar) व सहायक आयुक्त विवेक पाटील (Vivek Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नसुरक्षा अधिकारी गोपाल कासार, अमित रासकर, अविनाश दाभाडे यांनी कारवाई केली.

शिंदे गटाचे आमदार पोहोचले बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी

- Advertisment -

ताज्या बातम्या