Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMumbai Fire: मुंबईच्या मालाडमध्ये अग्नीतांडव! फर्निचरच्या गोदामांनी पेट घेतला

Mumbai Fire: मुंबईच्या मालाडमध्ये अग्नीतांडव! फर्निचरच्या गोदामांनी पेट घेतला

मुंबई । Mumbai

मुंबईच्या पश्चिम उपनगरात असणाऱ्या मालाडमध्ये (Malad News) शनिवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. मालाड-दिंडोशी (Dindoshi News) दरम्यान असणाऱ्या खडकपाडा परिसरात असणाऱ्या फर्निचरच्या गोदामांमध्ये ही आग लागली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी एका गोदामात लागलेली ही आग आजुबाजूला पसरत गेली आणि आता या आगीने भीषण स्वरुप धारण केले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला खडकपाडा परिसरातील एका गोदामाला आग लागली होती. यानंतर काही कळायच्या आत ही आग आसपास असलेल्या चार ते पाच गोदांमपर्यंत पोहोचली. गोदामात लाकडी साहित्य असल्याने आगीचा मोठा भडका उडत असून आग पसरत जात आहे. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिल्यानंतर अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...