लासलगाव | वार्ताहर | Lasalgaon
येथील कोटमगाव (Kotamgaon) रोडवर असलेल्या बीजे कॉम्प्लेक्सला (Complex) काल (शनिवार) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अचानक आग (Fire) लागल्याची घटना घडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे…
- Advertisement -
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या आगीत १२ ते १३ दुकाने जळून खाक झाली असून ही आग विझवण्यासाठी लहान गाड्या आणि पिंपळगाव (Pimpalgaon) येथील अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्यानंतर ही आग नियंत्रणात आली.
मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अस्पष्ट असून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच या आगीत दुकानदारांचे (Shopkeepers) लाखोंचे नुकसान झाले असून बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे आगीच्या ठिकाणी काहीसा गोंधळ निर्माण झाला होता.