Saturday, August 22, 2026
Homeनाशिकनाशकात भर रस्त्यात पडलं भलं मोठं भगदाड; थेट अवजड ट्रक जमिनीत फसला

नाशकात भर रस्त्यात पडलं भलं मोठं भगदाड; थेट अवजड ट्रक जमिनीत फसला

सातपूर | प्रतिनिधी
नाशिक शहरामध्ये सध्या सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून खड्ड्यांमुळे अनेकांचा निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर शेकडो जण जखमी झाले आहे. खड्ड्यांवरुन राजकारण तापलेले असतानाच शहरातील नवशा गणपती मंदिराकडे (Navsha Ganpati Road) जाणाऱ्या रस्त्यावर पावसाळी गटार योजनेच्या पाइपलाइनजवळ अचानक रस्ता खचल्याने अवजड ट्रक (Heavy Truck Plunged Into Road) थेट जमिनीत फसला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसली तरी पुन्हा एकदा महापालिकेच्या (Nashik Municipal Corporation) कारभारवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच उपमहापौर विलास शिंदे, नवशा गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र जाधव तसेच इतर नगरसेवक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महापालिका प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने बचावकार्य करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर ट्रक बाहेर काढण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली.

- Advertisement -

मोदींचा १२ वर्षांतील कारभारच सत्ताबदलाला कारणीभूत ठरेल – पृथ्वीराज चव्हाण

दरम्यान, हा रस्ता सुमारे 15 ते 20 वर्षांपूर्वीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. रस्त्याखालून ड्रेनेजची पाइपलाइन गेली असून, चेंबरच्या ठिकाणी गळती झाल्याने त्याठिकाणी मातीची धूप होऊन रस्ता कमकुवत झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

शहरातील जुन्या रस्त्यांखालून विविध प्रकारच्या पाइपलाइन गेलेल्या असल्याने अवजड वाहनांमुळे अशा ठिकाणी रस्ता खचण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कॉलनी व अंतर्गत रस्त्यांवर अवजड वाहने नेताना वाहनचालकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या घटनेनंतर संबंधित पाइपलाइन व रस्त्याची तातडीने पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

ताज्या बातम्या

खवड्या

‘आयफोन हे एकमेव कारण नाही’; खवड्या डोंगरावरील प्रकरणात पोलिसांचा मोठा खुलासा

0
छत्रपती संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagarवाळूज परिसरातील खवड्या डोंगरावर घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. १८ वर्षीय कुणाल चांदवडे याने डोंगरावरून टोकाचे पाऊल उचलल्यानंतर...