Tuesday, December 3, 2024
Homeदेश विदेशभारतीय नौदलाच्या MiG-29K विमानाला अपघात

भारतीय नौदलाच्या MiG-29K विमानाला अपघात

दिल्ली | Delhi

भारतीय नौदलाचं प्रशिक्षक मिग-२९के विमान गुरुवारी पहाटेच्या सुमारास अरबी समुद्रात कोसळलं आहे. अरबी समुद्रावरुन उड्डाण करत असताना विमान दुर्घटनाग्रस्त झालं. रेस्क्यू टीमने एका वैमानिकाला वाचवलं असून दुसऱ्या वैमानिकाचा शोध अद्याप सुरु आहे.

- Advertisement -

याप्रकरणी सध्या चौकशीचे आदेश दिले आहेत. भारतीय नौदलाकडून यासंबंधी अधिकृत माहिती देण्यात आली आहे. “भारतीय नौदलाचं मिग-२९के प्रशिक्षक विमान २६ नोव्हेंबरला पाच वाजता दुर्घटनाग्रस्त झालं. एका वैमानिकाचा शोध लागला आहे, तर दुसऱ्या वैमानिकाचा हवाई तसंच समुद्रमार्गे शोध घेतला जात आहे. याप्रकरणी चौकशीचा आदेश देण्यात आला आहे,” अशी माहिती भारतीय नौदलाने दिली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या