Saturday, July 27, 2024
Homeनाशिकआईने मुलीची मैत्रीण व्हावे!

आईने मुलीची मैत्रीण व्हावे!

डॉ. कल्पना संकलेचा

मुलींना होणार्‍या चुकीच्या मार्गदर्शनामुळे त्यांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढते आहे. काही मुले त्यांना नको ती आमिष दाखवून प्रेमजाळ्यात ओढून मुलींची पळून जाऊन लग्न करण्याची मानसिकता निर्माण करतात. यावर समुपदेशनाची गरज आहे.सध्या सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे कमी वयातच मुलींवर विपरित परिणाम होतो. शिक्षणासोबतच मुलींवर होणारे संस्कार देखील तितकेच महत्वाचे आहेत.

- Advertisement -

आईने मुलीला मैत्रिणीची वागणूक देणे गरजेचे आहे. आई व मुलींमध्ये सुसंवाद असण्याची गरज आहे. काही प्रमाणात मुली त्यांच्या प्रेमप्रकरणाबाबत आईला सांगतात. परंतु आईने नकार दिल्यामुळे व वडिलांची भीती वाटत असल्याने मुली पळून जाण्याचा मार्ग अवलंबतात. परंतु त्यामुळे आईची मानसिक परिस्थिती बिघडते. आईने मुलीशी सुसंवाद साधतांना मी सदैव तुझ्यासोबतच उभी आहे अशी भावना मुलीच्या मनात निर्माण केली पाहिजे जेणे करून घराबाहेर घडणार्‍या सर्व चांगल्या वाईट गोष्टी आईपर्यंत पोहोचवणे मुलीला मनापासून वाटले पाहिजे.

आजच्या मुली साधारणतः 12 व्या वर्षी वयात येतात त्यामुळे त्यांचे आकर्षण हे चुकणारच. त्याला जोड आता मोबाईलची आली आहे. मोबाइलमुळे त्यांच्या मैत्रिणी देखील कमी झाल्या आहेत.मुली प्रेमात पडल्यावर एक वेगळ्याच विश्वात वावरत असतात. त्यांच्या मधला हा बदल पालकांनी ओळखला पाहिजे. मुलांना रागवून किंवा धाक न दाखवता त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधला पाहिजे. मुख्य करून मुलीची आईशी जास्त जवळीक असल्याने आईने ती वयात आल्यावर तिची मैत्रीण होऊन समाजातील सर्वच अडचणींबद्दल चर्चा करून मुलीला सुरक्षितेची भावना वाटायला मदत केली पाहिजे.

शब्दांकन : मयूर जाधव

- Advertisment -

ताज्या बातम्या