Monday, June 24, 2024
HomeनाशिकNashik Road News : हप्ता न दिल्याने पेपर विक्रेत्याचा जाळला स्टॉल

Nashik Road News : हप्ता न दिल्याने पेपर विक्रेत्याचा जाळला स्टॉल

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

- Advertisement -

हप्ता व पेपर (Paper) फुकट दिला नाही म्हणून संतप्त झालेल्या एका युवकाने (youth) जेलरोड येथील कोठारी कन्या शाळेजवळ असलेल्या किशोर सोनवणे या पेपर विक्रेत्याचे (Paper Seller) दुकान पेट्रोल टाकून जाळून (Burn) टाकल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संशयित हप्ते मागणाऱ्या युवकास अटक (Arrested) करण्यात आली असून हा युवक नशेमध्ये असल्याचे समजते…

Political Special : मनसेनेत बदलाचे वारे सुरू; निवडणुकांमध्ये पुन्हा चमत्काराची तयारी

याबाबत अधिक माहिती अशी की, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे माजी अध्यक्ष किशोर सोनवणे यांचे जेलरोड (Jail Road) येथील कोठारी कन्या शाळेजवळ पेपर विक्रीचे दुकान (Shop) आहे.आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास किशोर सोनवणे यांचा सहकारी शरद कदम पेपर विक्रीच्या स्टॉलवर बसलेला असताना या ठिकाणी समीर गायधनी (Sameer Gaidhani) नावाचा युवक आला व त्याने पेपर फुकट दे व मला हप्ता दे अशी मागणी केली. कदम याने नकार देताच संतप्त झालेल्या गायधनी याने पेट्रोल (Petrol) टाकून संपूर्ण पेपर व दुकान जाळून टाकले. दरम्यान या घटनेनंतर परिसरात धावपळ उडाली व पळापळ झाली. सदर घटनेत पूर्ण दुकान जळून खाक (Burn) झाले असून सुमारे १५ ते २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

Video : सततचे अपघात, चालत्या वाहनांचे फुटतायेत टायर्स; कोटंबी, सावळघाट बनतोय मृत्यूचा सापळा

दरम्यान, वृत्तपत्र विक्रेते किशोर सोनवणे यांचा स्टॉल जाळल्याचे समजताच वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सुनील मगर, महेश कुलथे, विजय उदावंत, वसंत घोडे, विकास रहाडे, अनिल कुलथे, दत्ता मीराने, कुंदन शहाणे, उमेश शिंदे, बाळकृष्ण चंद्रमोरे, उल्हास कुलथे, किरण ठोसर, इब्राहिम पठाण, विजय रोकडे आधी तातडीने घटनास्थळी दाखल झाले व संशयित आरोपीला कठोर शिक्षा करावी अशी मागणी (Demand) केली.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

शिवसेना-राष्ट्रवादी आमदार अपात्रतेसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; विधानसभा अध्यक्ष आधीचंच वेळापत्रक सादर करण्याची शक्यता

- Advertisment -

ताज्या बातम्या