Wednesday, July 24, 2024
Homeमुख्य बातम्याNashik Crime News : तुला गोळ्या घालू का? असे म्हणत एकावर तीक्ष्ण...

Nashik Crime News : तुला गोळ्या घालू का? असे म्हणत एकावर तीक्ष्ण हत्याराने वार; संशयित फरार

पंचवटी | प्रतिनिधी |Panchvati

- Advertisement -

नाशिक शहरात ( Nashik City) गुन्हेगारीचे प्रमाण दिवसागणिक वाढतांना दिसत आहे. अशातच आता गोरक्षनगर (Gorakhnagar) येथील एका नागरिकाला एका संशयितांने ‘तुला गोळ्या घालू का?’ असे म्हणत त्या नागरिकावर तीक्ष्ण हत्याराने वार (Stab With a Weapon) करत संशयित हल्लेखोर पसार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे….

याबाबत अधिक माहिती अशी की, गोरक्षनगर परिसरातील (Gorakshanagar Area) एक नागरिक आपल्या कुटुंबासोबत राहतात. रविवार (दि.२४) रोजी रात्री ९ ते ९.३० वाजेच्या सुमारास फिर्यादी यांची आई व बहीण घराबाहेर उभ्या होत्या. त्यावेळी दुचाकीहून काही संशयित (Suspect) आपल्या भागात घिरट्या घालत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

मोठी बातमी! शिक्षक भरतीसाठी तरुणाचे आंदोलन; मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर मारली उडी

यावेळी त्यांनी घिरट्या घालणाऱ्या संशयितांना हटकले आणि विचारणा केली की, आपल्याला कोण पाहिजे आहे? पत्ता सापडत नाहीये का? असे विचारताच दुचाकीवर असलेल्या एकूण तीन संशयितांपैकी एका संशयिताने बंदूक रोखत ‘तुला गोळ्या घालू का’? असे म्हटले. त्यानंतर यातील एका संशयिताने तीक्ष्ण हत्याराने त्या जागरूक नागरिकावर वार केला. मात्र, तो वार त्या नागरिकाने हुकवण्याचा प्रयत्न केला, परंतु, यात त्यांना किरकोळ डोळ्याच्या वर इजा झाली.

Nashik Rain News : नाशकात पावसाची ‘जोर’ धार; नागरिकांची तारांबळ

दरम्यान, याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात (Mhasrul Police Station) अदखल पात्र (Indictable offence) गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करीत आहेत. तसेच घटनास्थळापासून म्हसरूळ पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर असल्याने या घटनेमुळे म्हसरूळ पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. त्यामुळे या घटनेकडे बघता पोलिसांनी ‘ॲक्शन’ मोडमध्ये येऊन गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची गरज निर्माण झाली आहे.

Nashik News : गोणीत आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात खळबळ

म्हसरूळ परिसरात अवैध हॉटेल असून त्याठिकाणी पोलिसांच्या वरदहस्ताने दिवसभर अवैध दारूचे खुलेआम सेवन केले जाते. त्यातून गुन्हेगारीला बळ मिळत असल्याचे नागरिक बोलत आहे. याबाबत वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रारी करण्यात आल्या असून यासंदर्भात निर्णय घेण्यात ते असमर्थता दाखवत असल्याचे बोलले जात आहे. अशी परिस्थिती परिसरात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या