Sunday, May 26, 2024
Homeजळगावगरोदर आदिवासी महिलेचा प्रसूतीपूर्वीच जिल्हा रुग्णालयात मृत्यू

गरोदर आदिवासी महिलेचा प्रसूतीपूर्वीच जिल्हा रुग्णालयात मृत्यू

जळगाव – Jalgaon

तालुक्यातील चिंचोली येथे शेतात वास्तव्य करणार्‍या आदिवासी गरोदर विवाहितेचा प्रसूतीपूर्वीच बुधवारी रात्री दहा वाजता जिल्हा रुग्णालयात (district hospital) मृत्यू झाला आहे दरम्यान गुरुवार, ११ ऑगस्ट रोजी शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

- Advertisement -

मूळ चोपडा (Chopada) तालुक्यातील कालीकुंडी येथील बारेला कुटुंबिय रोजगारासाठी गेल्या चार वर्षापासून जळगाव (Jalgaon) तालुक्यातील चिंचोली येथील वास्तव्यास आहे. याठिकाणी शेतात मजुरीचे काम करुन शेतातच कुटुंबिय वास्तव्यास आहेत. गरोदर होवून आठ महिने पूर्ण झाले असतांना बुधवार, ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास मीनाच्या पोटात दुखायला लागले. त्यामुळे कुटुंबियांनी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास तिला थेट जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असतांना रात्री दहा वाजेच्या सुमारास प्रसूतीपूर्वीच मीनाचा बारेला हिचा मृत्यू झाला. तिच्या पोटात बाळाचा मृत्यू झालेला होता. तिच्या पश्‍चात पती, दिनेश बारेला, सासरे, सासू असा परिवार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या