Sunday, May 19, 2024
Homeनंदुरबारशेतात वीज जोडणीसाठी २७ हजार ५०० रुपयांची लाच स्विकारताना वायरमनसह खाजगी वायरमनला...

शेतात वीज जोडणीसाठी २७ हजार ५०० रुपयांची लाच स्विकारताना वायरमनसह खाजगी वायरमनला अटक

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

भोणे शिवारातील शेतात वीज कनेक्शन (Power connection) घेण्यासाठी ३० हजाराची लाच मागून तडजोडीअंती २७ हजार ५०० रुपयांची लाच स्विकारताना (Accepting bribes) खाजगी वायरमनला (private wireman) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Bribery Prevention Department) पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी वीज वितरण विभागाच्या (power distribution department) वायरमनलाही (Wireman) अटक (arrested) करण्यात आली आहे. या रकमेत १५ हजार रुपये डिमांड नोटच्या रकमेचा समावेश आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांच्या भोणे ता.नंदुरबार शिवारात शेत असून, शेतात वीज कनेक्शन (Power connection) घ्यावयाचे असल्याने तक्रारदाराने महावितरणच्या (MSEDCL) नंदुरबार येथील कार्यालयात ऑक्टोबर २०२१ मध्ये डिमांड नोटसाठी ऑनलाईन अर्ज (Apply online) केला होता.

त्यानंतर तक्रारदार यांनी वारंवार वीज वितरण कार्यालयाशी संपर्क साधला असता वायरमन अनिल मांगडुभोये यांनी खाजगी वायरमन देवा मराठे याच्यामार्फत ३० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती २७ हजार ५०० रुपये देण्याचे ठरले. यात १५ हजार रुपयांची डिमांड नोट व १२ हजार ५०० रुपये लाचेचा(bribes) समावेश होता.

तक्रारदारांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (Bribery Prevention Department) कळविले. खाजगी वायरमन देवा मराठे याने २७ हजार ५०० रुपये पंच साक्षीदारांसमोर स्विकारले. याप्रकरणी देवानंद ऊर्फ देवा पंडित मराठे (रा. रजाळे ता.जि.नंदुरबार), म.रा.वि.वि.कंपनीचे (MSEDCL) वायरमन अनिल मांगडू भोये (रा.प्लॉट नं.१, सिध्देश्वर नगर, कोकणीहिल, दुधाळे शिवार, ता.जि.नंदुरबार) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सदर कामगिरी पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी, पोलिस निरीक्षक समाधान वाघ, पोलीस निरीक्षक श्रीमती माधवी वाघ, हवालदार विजय ठाकरे, पोना अमोल मराठे, पोना देवराम गावीत, नावाडेकर, पोना मनोज अहिरे, चापोना जितेन्द्र महाले, यांच्या पथकाने केली.

भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणीबाबत लोकसेवकाबद्दल तकार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नंदुरबार कार्यालयास संपर्क करावा असे आवाहन पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या