Sunday, September 15, 2024
HomeनाशिकVideo : नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

Video : नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

नाशिक | Nashik

- Advertisement -

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा (Heat) कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना (Vehicles) आग (Fire) लागल्याच्या घटना घडत आहेत. अशातच आज नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने (Car) पेट घेतल्याची घटना घडली आहे.त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर (Nashik-Chhatrapati Sambhajinagar Highway) निफाड तालुक्यातील (Niphad Taluka) पिंपळस ते गोंडेगाव फाट्या दरम्यान असणाऱ्या बानगंगा पुलावर सदर धावती कार पेटली आहे. सुदैवाने या घटनेत अंदरसुल येथील चालक
आकाश राजेंद्र राऊत (वय २४) हा तरुण थोडक्यात बचावला आहे.

दरम्यान, सदर कारने कशामुळे पेट घेतला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. तसेच या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, कार जळून खाक (Burn) झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या