Friday, June 12, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनिफाड तालुक्यातील चार महसूल मंडळांसाठी स्वतंत्र तहसील कार्यालय निर्माण होणार

निफाड तालुक्यातील चार महसूल मंडळांसाठी स्वतंत्र तहसील कार्यालय निर्माण होणार

अपर तहसील कार्यालय, लासलगावची अधिसूचना निर्गमित

- Advertisement -

लासलगाव | वार्ताहर Lasalgaon

राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याला यश आले असून निफाड तालुक्यातील लासलगाव, विंचूर, देवगाव आणि नांदूर मध्यमेश्वर या महसूल मंडळांतील नागरिकांच्या सोयीसाठी नवीन तहसील कार्यालय निर्माण करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. त्याअंतर्गत अपर तहसील कार्यालय, लासलगाव स्थापनेची अधिसूचना शासनाकडून निर्गमित करण्यात आली आहे.

लासलगाव परिसरातील नागरिकांना विविध महसूल विषयक कामांसाठी निफाड तहसील कार्यालयात जावे लागत असल्याने त्यांना वेळ व आर्थिक खर्चाचा मोठा बोजा सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून लासलगाव येथे अपर तहसील कार्यालय स्थापन करण्याची मागणी लावून धरली होती.

या निर्णयामुळे लासलगाव, विंचूर, देवगाव आणि नांदूर मध्यमेश्वर परिसरातील नागरिकांना महसूल प्रशासनाशी संबंधित सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिक सुलभतेने मिळणार आहे. तसेच प्रशासकीय कार्यक्षमतेत वाढ होऊन नागरिकांची दैनंदिन कामे अधिक वेगाने मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

ताज्या बातम्या

Crime News : नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 12.75 लाखांची फसवणूक

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar आरोग्य विभाग, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि शाळा अशा विविध ठिकाणी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तरूणाची तब्बल 12 लाख 75 हजार...