Saturday, July 27, 2024
Homeनगरआ. थोरातांच्या स्विय सहायकाच्या घराजवळून जप्त केले बांधकाम कामगारांचे साहित्य संच

आ. थोरातांच्या स्विय सहायकाच्या घराजवळून जप्त केले बांधकाम कामगारांचे साहित्य संच

आश्वी (वार्ताहर)

बांधकाम कामगारांना देण्यात येणाऱ्या साहित्याच्या १० संच पेट्या बेकायदेशिररित्या बाळगून शासनाची फसवणूक केली व सरकारी कामात अडथळा आणला म्हणून आमदार बाळासाहेब थोरात यांचे स्विय सहायक विजय ऊर्फ पांडुरंग जगन्नाथ हिंगे यांच्यासह ५ ते ६ इसमांविरुद्ध आश्वी पोलीस ठाण्यात फसवणूकीसह सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. हिंगे यांच्या नेतृत्वाखाली लढवलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याने विरोधकांनी केलेले हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप करत आश्वी बुद्रुक ग्रामस्थांनी काल गाव बंद ठेवले.

- Advertisement -

बांधकाम कामगारांच्या संच संदर्भात ईमेलवर तक्रार अर्ज प्राप्त झाल्याने सहाय्यक कामगार आयुक्त श्री. कवले यांनी कामगार अधिकारी तुषार बोरसे व दुकान निरीक्षक ललित प्रकाश दाभाडे यांना सदर ठिकाणी जावून चौकशी करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे दि. १७ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास सदर अधिकाऱ्यांनी संगमनेरचे तलाठी यांना पंच म्हणून सोबत घेत सदर ठिकाणी जावून पाहणी केली. निमगावजाळी ते आश्वी बुद्रूक रोडचे उजव्या बाजुस विजय हिंगे यांचेकडे आश्वी बुद्रूक येथे जावून केलेल्या पाहणीत बांधकाम कामगारांना देण्यात येणारे संच प्रत्येकी किंमत ८ हजार ५०० असे एकूण १० संच बेकायदेशिररित्या आढळून आले. सुमारे ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला आहे.

सदर कारवाईच्यावेळी अज्ञात ५ ते ६ इसमांनी अधिकाऱ्यांना सरकारी काम करत असतांना अडथळा आणला. सदर १० संच हे विजय हिंगे यांच्या घराच्या पाठीमागील भिंतीलगत ऊसाच्या शेतात आढळून आल्या. या पेट्या मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रे बनवून कुणाची तरी नावे वाटप करुन घेतल्या परंतु त्या कामगारांना वाटप न करता स्वतःजवळ बाळगून शासनाची फसवणूक केली. तसेच सरकारी अधिकाऱ्यांना सरकारी कामकाज करत असतांना शारीरिक बळजबरी करुन कामकाजात अडथळा आणला, अशी फिर्याद कामगार अधिकारी तुषार बोरसे यांनी दिली.

या फिर्यादीवरुन आश्वी पोलिसांनी विजय ऊर्फ पांडुरंग जगन्नाथ हिंगे (रा. आश्वी बुद्रूक, ता. संगमनेर) याच्यासह अज्ञात ५ ते ६ इसमांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर २३८/२०२३ भारतीय दंड संहिता ४२०, ४६३, ४६५, ४६८, ३५३, ३४१, १४३, १४७, १८६ नुसार दाखल केला आहे. अधिक तपास आश्वी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

राजकीय हेतूने कारवाईचा आरोप; आश्वी बुद्रूक येथे कडकडीत बंद

आश्वी (वार्ताहर)

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सत्ता न मिळलेल्या विरोधकांनी षडयंत्र रचत सामाजिक काम करणाऱ्या विजय हिंगे यांच्या घरामागील ऊसात बांधकाम कामगार योजनेतील पेट्या टाकून खोटे गुन्हे दाखल करण्याच्या प्रयत्न केला. मात्र जागरुक ग्रामस्थांच्या एकीमुळे तलाठ्यासह तपासणी करणारे आधिकारी तत् मम् करत बसले, यामागील सुत्रधार १५ दिवसात शोधा अन्यथा पोलिस स्टेशन समोर सर्व ग्रामस्थ आमरण उपोषण करणार असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी दिला. संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रक येथील माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे स्वीय साहाय्यक विजय हिंगे यांच्या नेतृत्वाखालील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदाचा उमेदवार विजयी झाल्याने पराभव जिव्हारी लागलेल्या विरोधकांनी षडयंत्र रचत हिंगे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न झाल्याने सर्व ग्रामस्थ एकत्र येत ‘दूध का दूध पाणी का पाणी’ करण्यासाठी निषेध सभा घेण्यात आली. या निषेध सभेतून आश्वी व परिसरातून आलेल्या लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी रिपाईचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते विजय हिंगे, काँग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले, माजी सरपंच महेश गायकवाड, उपसंरपच राहुल जऱ्हाड, किशोर जऱ्हाड, रिपाई (गवई) जिल्हाध्यक्ष किशोर वाघमारे, उंबरी बाळापूरचे माजी ग्रामपंचायत सदस्य विजय शेळके, संतोष ताजणे, गणेश गायकवाड, बाळासाहेब बिहाणी, नवनाथ आंधळे, डॉ. संजय सांगळे, संतोष नागरे, संजय कोल्हे, भाऊसाहेब खेमनर, अनिल भुसाळ, प्रशांत कोळपकर, अमोल त्रिभुवन, दिलावर शेख, शिबलापूर संरपच प्रमोद बोंद्रे, जालिंदर बोंद्रे आदीसह हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बाळासाहेब गायकवाड म्हणाले, गलिच्छ राजकारण करुन प्रामाणिकपणे सामाजिक काम करणाऱ्या तरुणावर खोटे आरोप करणे म्हणजे आपल्या बालिशपणाचे प्रदर्शन करु नका ग्रामपंचायती मधून काय मिळते? राजकारणात हार-जीत चालू रहाते. ज्याला हार पचवत नाही त्यांनी गलिच्छ राजकारणातून खोटेनाटे प्रयोग करु नये हवे असेल तर नूतन संरपचासह ही नविन इमारत सुद्धा तुम्हाला घ्या मात्र प्रामाणिक माणसाला बदनाम करु नका.

आधिकाऱ्यांच्या माध्यमातून हिंगे यांच्या घराभोवती जे षडयंत्र रचण्यात आले ते राजकिय क्षेत्राला काळिमा फासणारी घटना आहे. वयोवृद्ध महिलेला जाणून-बुजून त्रास देण्यात आल्याने ग्रामस्थ सुद्धा आज एकत्र आल्याचे गायकवाड यांनी म्हटले.

यावेळी विजय हिंगे म्हणाले, आजपर्यत मी प्रामाणिक काम केले. गोरगरिबांचा पैसा खाऊन मी मोठा होणार नाही. लोकांचा विश्वास व दिशा असल्याने माझ्या हातात पुन्हा ग्रामपंचायत दिली. यातुन मी लोकांचा विश्वासघात करणार नाही मात्र, मी केलेल्या प्रामाणिक कामाला छेद लावण्याकरिता या ना त्या मार्गाने प्रयोग होत आहे. आता लोकांनी ही ओळखल्याचे त्यांनी सांगितले.

निषेध सभा संपल्यानंतर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आश्वी बुद्रुक बाजारतळावर आगमन होताचं संपूर्ण ग्रामस्थांनी त्याच्या समोर झालेल्या घटनेची कैफियत मांडल्याने जिल्हा पोलिस अधिक्षकांशी बोलून सखोल चौकशी करण्याचे सांगतो. म्हणत हा सर्वसामान्याविरोधात होणारा दहशत चांगला नाही त्यांचे झाकण निश्चितचं उघडते.

बांधकाम कामगारांचे संगमनेर मधून २० हजार प्रकरण करण्यात आले. यात हिंगे यांचा मोठा वाटा असल्याचे संजय कोल्हे यांनी सागितले तर गावातील व्यापाऱ्यासह, शेतकरी, तरुणांनी एकत्र येत उस्फुर्तपणे निषेध व्यक्त करत गाव बंद ठेवण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या