Sunday, September 29, 2024
Homeधुळेभरधाव ट्रकची दुचाकीला धडक ; पत्नी ठार, पतीसह दीर जखमी

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक ; पत्नी ठार, पतीसह दीर जखमी

धुळे । प्रतिनिधी dhule

मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra Highway) पारोळा चौफुलीवर भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात पत्नी ठार तर पतीसह दीर जखमी झाला. काल सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास हा अपघात (accident) झाला. अपघातप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा नोंद झाला आहे. भगडीबाई नहारसिंग घुसा (वय 35 रा. शिरूड ता. धुळे) असे मयत महिलेचे नाव आहे. त्या पती नहारसिंग घुसा तवर व दीर यांच्यासोबत दुचाकीने जात होते.

- Advertisement -

त्यादरम्यान पारोळा चौफुलीवर त्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रकने राँग साईटने ओव्हरटेक करून मागून जबर धडक दिली. त्यात भगडीबाई या ठार झाल्या. तर दोघे जखमी झाले. याबाबत जखमी नहारसिंग तवर यांनी आझादनगर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहेकाँ सैंदाणे हे पुढील तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या