Saturday, April 26, 2025
Homeधुळेधुळ्यात भरधाव दुचाकीची धडक, सेंधव्यातील पादचारी तरूण ठार

धुळ्यात भरधाव दुचाकीची धडक, सेंधव्यातील पादचारी तरूण ठार

धुळे ।dhule । प्रतिनिधी

मुंबई-आग्रा महामार्गावरील शहरातील वरखेडी ब्रिजजवळ भरधाव दुचाकीने (speeding two-wheeler) पादचारी तरूणाला (young pedestrian) जबर धडक दिली. त्यात सेंधवा येथील तरूण ठार (killed) झाला. हा अपघात काल पहाटेच्या सुमारास झाला. याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मांगीलाल सखाराम पवार (वय 35 रा. 9 पटेल फाल्याफाल्या घुडचल पो.महितगाव, सेंधवा जि. बडवाणी, मध्यप्रदेश) असे मयत तरूणाचे नाव आहे. त्यास वरखेडी ब्रिजजवळ काल दि. 23 रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास धुळ्याहून शिरपूरकडे एमएच 18 बीएफ 1120 क्रमांकाच्या भरधाव दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. त्यात गंभीर जखमी होवून तरूणाचा मृत्यू झाला. अपघातानंतर दुचाकीस्वार पळून गेला. याबाबत सखाराम बातरीया पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दुचाकी चालकावर आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोहेकाँ जाधव पुढील तपास करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सांत्वन

0
पुणे । प्रतिनिधी Pune जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे या पर्यटकांच्या घरी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...