Saturday, May 25, 2024
Homeनाशिकप्रलंबित वैद्यकीय देयके मार्गी लावण्याची मागणी

प्रलंबित वैद्यकीय देयके मार्गी लावण्याची मागणी

दिंडोरी | प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे वैद्यकीय बिले तसेच सातवा वेतन आयोगाचा दुसरा तिसरा हप्ता व इतर थकीत अनुदानित गेल्या तीन वर्षापासून शासन स्तरावर प्रलंबित असुन सदर देयके त्वरित अदा करावी यासाठी पाठपुरावा करण्या संदर्भात दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने आमदार सत्यजित तांबे यांना निवेदन देण्यात आले.

- Advertisement -

दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन वडजे, प्रसिद्धीप्रमुख विलास जमदाडे, तालुका उपाध्यक्ष सचिन वसमतकर आदींनी आमदार सत्यजित तांबे यांची भेट घेऊन प्राथमिक शिक्षकांची वैद्यकीय बिले गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित असल्याचे निदर्शनास आणून दिले.

इतर वेतन फरक थकीत अनुदानित देखील प्रलंबित असून शिक्षकांची आर्थिक बिले मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करावा असे आमदार तांबे यांना शिक्षक संघाच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले. आमदार तांबे यांनी प्रलंबित थकीत फरक बिलासंदर्भात शालेय शिक्षण विभाग तसेच अर्थ विभागाकडे पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या