Saturday, July 27, 2024
Homeनाशिकरस्त्यांसाठी आंदोलनाचा इशारा

रस्त्यांसाठी आंदोलनाचा इशारा

जानोरी । वार्ताहर Janori

मोहाडी-साकोरा मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत

- Advertisement -

येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी डंपरने मुरूम वाहतांना अवजड वाहनांची ने-आण केल्यामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. शेतमाल नेत असताना वाहने पलटी होऊन त्याचा आर्थिक भुर्दंड शेतकर्‍यांना बसत आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस चालू असून रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचा नेमका अंदाज येत नसल्यामुळे लहान-मोठे अपघातांची मालिका सुरू होत आहे.

वारंवार प्रशासनाला लक्षात आणून देखील रस्त्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याची प्रचिती मोहाडी-साकोरा रस्त्याकडे बघितल्यावर लक्षात येते. यामार्गे आग्रा महामार्गावर चालू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी डंपरने मुरूम वाहने सर्रास चालू आहे.

क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात मुरूम भरून या मार्गाने डंपर नेले जातात त्यामुळे रस्त्याची क्षमता कमी असल्याने या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पिंपळगाव बाजारपेठ ही शेतकर्‍यांसाठी महत्त्वाची असल्याने पंचक्रोशीतील शेतकरी या रस्त्याचा वापर करीत असतात.परंतु या रस्त्याने मालवाहतूक गाड्या नेणे जिकरीचे झाले आहे.

साकोरा मोहाडी रस्त्याची रुंदी वाढवून तात्काळ अवजड वाहनांसाठी क्षमता असलेल्या चांगल्या दर्जाचा रस्ता करून मिळावा अन्यथा हा रस्ता बंद पाडून आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे, कादवा कारखाना संचालक शहाजी सोमवंशी, द्राक्ष बागायतदार संघाचे सदस्य सुरेश कळमकर यांसह स्थानिक शेतकर्‍यांनी दिला आहे.

उड्डाणपुलाच्या कामासाठी या रस्त्यावरून क्षमतेपेक्षा जास्त अवजड वाहने जात आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. त्याचा भुर्दंड शेतकर्‍यांना बसत असून त्याचा उद्रेक होण्याआधी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.

भास्कर भगरे, जि. प. सदस्य

खासदार व आमदारांना सांगून देखील यावर काही कायमस्वरूपी उपाय निघत नसल्यामुळे शेतकर्‍यांचा उद्रेक झाला असून लवकरात लवकर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही हा रस्ता पूर्णपणे वाहनांसाठी बंद करून आंदोलन करू.

शहाजी सोमवंशी, संचालक कादवा कारखाना

- Advertisment -

ताज्या बातम्या