Saturday, July 27, 2024
HomeUncategorizedकहाणी आजी आणि नातवाच्या प्रेमाची

कहाणी आजी आणि नातवाच्या प्रेमाची

सुनील गायकवाड

दिलेल्या वचनासाठी नातवाने (Grandson) आपल्या दिवंगत आजीसाठी खरेदी केली तब्बल 4 लाखांची सोन्याची पैठणी (golden paithani) खरेदी केली आहे.

- Advertisement -

मूळचा कोल्हापूर (Kolhapur) येथील अलोक किरण चौगुले याचा जन्म 1992 या वर्षी झाला तेव्हापासून आलोक चा सर्व सांभाळ त्याची आजी स्व. शामाबई चौगुले हीच करायची त्यामुळे नातवाचा आजीमध्ये (grandmother) आणि आजीचा नातवामध्ये खूप जीव होता.

यावर्षी आलोक बोलायचे शिकला. एक दिवस सहज आजीच्या प्रेमापोटी आपल्या स्व. कमाई मधून आजी मी तुला माझ्या लग्नात सोन्याची साडी (golden saree) घेईल असा सहज बोलून गेला होता. अलोक चौगुले चांगले शिकून मोठा व्यवसायिक होता आणि आजी नातवाचे नाते आणखी घट्ट होत गेले होते. घरात आलोकच्या लग्नाची चर्चा सुरू झाली होती नियतीने वेगळंच काहीतरी लिहले होते.

7 नोव्हेंबर 2021 रोजी अलोकची आजी श्यामाबाई राजाराम चौगुले यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले या घटनेने चौगुले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला मात्र सर्वात जास्त दुःख झाले होते ते आलोकला. त्याचे कारण म्हणजे आपल्या स्वतःच्या कमाईतून आपल्या लाडक्या आजीला सोन्याची जर असलेली पैठणी खरेदी करायची. लग्नात तीच पैठणी (paithani) आजी नेसणार देखील होती मात्र आजी देवा घरी गेली होती. आजीची इच्छा अपूर्णच राहिली होती. नातू आलोकला ही खंत सतावत होती. आजी आपल्याला लग्नात कोणत्या ना कोणत्या रूपाने येणार हा विश्वास ही भावना आलोकच्या मनात घर करून बसली होती.

त्यामुळे अलोकने आपले वडील किरण चौगुले आपल्या देवा घरी गेलेल्या आजीसाठी सोन्याची पैठणी बनवू आणि तिची आठवण म्हणून कायमस्वरूपी फोटो समोर ठेवू अशी इच्छा बोलून दाखवली. वडिलांना सुद्धा गहिवरून आलं त्यांनी क्षणात होकार दिला. मात्र हे सर्व झाल्यानंतर आता अस्सल पैठणी मिळणार कुठे हा प्रश्न चौगुले कुटुंबांना पडला चौगुले कुटुंब मूळचे कोल्हापूरचे मात्र व्यवसायामुळे नवी या ठिकाणी ते स्थायिक झाले होते. अशाच वेळी टीव्ही वर अकरा लाखाची पैठणी संदर्भात एक कार्यक्रम नातू आलोक चौगुले ने पाहिला आणि ही पैठणी येवल्यातल्या कापसे पैठणी येथे बनली आहे याची माहिती त्याला मिळाली.

क्षणाचाही विलंब न करता आलोक चौगुले त्याचे वडील किरण चौगुले या दोघांनी येवला शहर गाठलं कापसे पैठणीचा शोध घेत कापसे पैठणीचे संचालक दिलीपदाजी खोकले यांची भेट घेतली सुरुवातीला एवढी महागडी पैठणी वेळेअभावी शक्य तयार करणे शक्य होणार नाही असे सांगून दिलीप खोकले यांनी चौगुलेंना नकार दिला मात्र ही साडी आपल्या स्वर्गवासी आजीची शेवटची इच्छा म्हणून बनवायची आहे, हे ऐकताच कापसे यांनी सोन्याची जर असलेली तयार करून देण्याचे मान्य केले पैठणी बनवण्यासाठी किमान 8 ते 9 महिन्यांचा कालावधी लागनार होता मात्र अलोकचे लग्न अवघ्या चार महिन्यांवर आले होते.

अतिसूक्ष्म कलाकुसर आपल्या कुशल हाताने करत कापसे पैठणीच्या कारागिरांनी दिवस-रात्र एक करून सोन्याची जर असलेली अस्सल चार लाखांची पैठणी साडी तयार केली . येत्या 28 नोव्हेंबरला मुंबई (mumbai) येथे अलोक चौगुले यांचे लग्न असून या लग्नात हि चार लाखांची पैठणी आजीची आठवण म्हणून आजीच्या फोटो पुढे ठेवली जाणार आहे .अशा पद्धतीने आलोकने आपल्या स्वर्गवासी आजीची शेवटची इच्छा आणि आठवण म्हणून चार लाखांची सोन्याची पैठणी साडी खरेदी करून एक प्रकारे आपल्या आजीला दिलेला शब्द पूर्ण केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या