Thursday, May 22, 2025
Homeनाशिकआरोग्य केंद्रांची अचानक तपासणी

आरोग्य केंद्रांची अचानक तपासणी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

आरोग्य विभागाचा कारभार तुकाराम मुंढे यांनी हाती घेतल्या नंतर राज्यातील संपूर्ण आरोग्य विभाग ( Department of Health ) मरगळ झटकून कामाला लागला आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या ( Zilla Parishad Nashik )आरोग्य विभागातर्फे गुरुवारी (दि.३) जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्रांची स्थिती,तेथील सोईसुविधा,त्रुटी,उणिवा, औषधांची उपलब्धता,विविध योजनांचा लाभ कसा दिला जातो याची तपासणी करण्यासाठी पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता.याचा अहवाल तात्काळ देण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी दिले आहेत.

दरम्यान,या अहवालानुसार याअंतर्गत काही त्रुटी, उणिवा असतील तर याचा जाब शुक्रवारी (दि.४) जिल्हा परिषद मुख्यालयात होणाऱ्या तालुका वैद्यकीय अधिकारी यांना विचारला जाणार आहे. व ज्यांचे काम चागले आहे,त्यांचे कौतुकही होणार असल्याचे सांगण्यात आले.

पंधरा तालुक्यांतील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, उपरुग्णालये, यांची 15 जिल्हा पर्यवेक्षक व आठ जिल्हास्तरीय डॉक्टर असलेले अधिकारी यांची तपासणीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी गुरुवारी सायंकाळी तपासणी अहवाल जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला.

पाहणी दौऱ्यादरम्यान, औषधाची उपलब्धता, कर्मचाऱ्यांची दैनंदिनी, ॲडव्हान्स टुर प्लॅनप्रमाणे (एटीपी) कामे होतात की नाही यांची तपासणी करण्यात आली. याचबरोबर क्षयरोग तपासणी, लसीकरण, असंसर्गजन्य आजार (हायपर टेन्शन, डायबिटीज, कॅन्सर) तसेच डेंग्यु, पिण्यास योग्य पाण्याची स्थिती, केंद्रातील स्वच्छता, लॅब टेस्ट, महिलांची प्रसुतीसाठी आवश्यक उपकरणांची उपलब्धता यांची तपसणी करण्यात आली.याचवेळी अति जोखमीच्या मातांची स्थिती, त्यांना देण्यात येणारे आर्थिक लाभ, देण्यात येणाऱ्या सोई-सुविधा यांची पाहणी करण्यात आली.

याअगोदर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दोन भेटी दिल्या असून गुरुवारी (दि.४) जिल्हा पर्यवेक्षक, जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा सरप्राईज भेट दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँक भरतीप्रकरणी नोटिसा बजावण्याचे आदेश

0
कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेतील भरतीत घोटाळा झाल्याचा आरोप करणार्‍या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दखल घेतली असून बँकेचे अध्यक्ष व भाजपाचे...