Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजआगामी विधानसभा निवडणुकीत मविआ महायुतीवर पडणार भारी

आगामी विधानसभा निवडणुकीत मविआ महायुतीवर पडणार भारी

तब्बल 'इतक्या' जागा मिळण्याचा अंदाज

मुंबई | Mumbai

लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) राज्यात महाविकास आघाडीने (Mahavikas Aaghadi) ४८ पैकी ३० जागा तर महायुतीने (Mahayuti) १७ जागांवर विजय मिळविला. तसेच एका जागेवर अपक्ष उमेदवाराने विजयी झाला आहे. मात्र, या अपक्ष उमेदवाराने मविआमधील कॉंग्रेसला (Congress) पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मविआची खासदारांची संख्या ३१ वर पोहचली असून महायुतीला लोकसभा निवडणुकीत चांगलाच दणका बसला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Hiraman Khoskar : “मी पक्षाशी कुठलीही गद्दारी केली नाही, माझी बदनामी थांबवा” – आमदार खोसकर

महाविकास आघाडीने मिळविलेल्या यशानंतर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा (Shivsena) आत्मविश्वास वाढला आहे. त्यानंतर आता राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. सध्या दोन्ही युती आणि आघाडीत विधानसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहेत.त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

हे देखील वाचा : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रचारसभेत गोळीबार; शुटरचा खात्मा

अशातच आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तपत्र समूहाने केलेल्या सर्वेक्षणात आगामी निवडणुकीत राज्यात कुणाचे सरकार येणार? असा प्रश्न मतदारांना (Voter) विचारण्यात आला होता. नुकतीच त्याची आकडेवारी समोर आली असून यात ४८.७ टक्के लोकांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असे मत नोंदवले आहे. तर ३३.०१ टक्के लोकांनी राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येईल, असा अंदाज वर्तविला आहे. तब्बल ८४ ह्जाराहून अधिक लोकांशी संवाद साधून या वृत्तपत्र समूहाने हे सर्वेक्षण केले आहे.

हे देखील वाचा : Weather Forecast : आजही मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबईत यलो अलर्ट तर ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

या सर्वेक्षणानुसार आगामी विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) राज्यात महाविकास आघाडीला १५२ तर महायुतीला १३६ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यात मविआतील ठाकरेंच्या शिवसेनेचे ३१, शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ४१ आणि कॉंग्रेसचे ६७ आमदार (MLA) निवडून येतील असे भाकीत वर्तविण्यात आले आहे. तर महायुतीमधील भाजपचे ९५, शिंदेंच्या शिवसेनेचे २७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे १८ आमदार निवडून येऊ शकतात, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.

हे देखील वाचा : सात राज्यांतील विधानसभा पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीचा डंका; भाजपाचा दारूण पराभव

दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादीत (Shivsena and NCP) झालेल्या फाटाफुटीचा फायदा या सर्वेक्षणानुसार आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत कॉंग्रेसला तर महायुतीमध्ये भाजपला होतांना दिसत आहे. तसेच पक्ष फुटीचा तोटा हा सर्वाधिक अजित पवारांच्या राष्ट्रवादीला होताना दिसत आहे.कारण सध्या अजित पवार गटाकडे ४२ आमदार आहेत. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत ही संख्या थेट १८ वर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष निवडणुकीवेळीच कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात? हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या