धुळे – प्रतिनिधी dhule
धुळे-चाळीसगाव (chalisgaon) महामार्गवरील (Highway) गरताड बारीनजीक हाइड्रोजन पेरोक्साइड (hydrogen peroxide) नेणाऱ्या टँकर (जीजे 16 एयु 4875) रस्त्याच्या कडेला उलटून अपघात झाला.
या पलटी झालेल्या टँकरमधून गळतीही सुरु झाली. धूर निघत असल्याने भीती निर्माण झाली होती. परंतु हें केमिकल ज्वलनशील नसल्यामुळे मोठी हानी टळली. सुदैवाने अपघातात कोणालाही इजा झाली नाही. मात्र…
पिंपळनेरमधील घरफाेडींचा उलगडा ; तीन अल्पवयीन मुलांसह चार ताब्यात
टँकरचे नुकसान झाले आहे. हा टँकर गुजरात (Gujarat) राज्यातील बडोद्याहून (Baroda) हैदराबादकडे (Hyderabad) जात होता. अपघाताची माहिती मिळतात मोहाडी पोलीस (police) ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी खबरदारी म्हणून तात्काळ धुळे महापालिकेला अग्निशामक विभागाला (Fire Department) माहिती दिली. अग्निशामक बंबासह विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. बंबद्वारे पाण्याचा मारा करून गळती रॊखण्यात आली. तसेच स्क्रीनच्या साह्याने टँकर उभे करण्यात आले. दरम्यान मोहाडी पोलिसांच्या समयसूचकता, तत्परतेचे कौतुक होत आहे.
पिंपळनेरमधील घरफाेडींचा उलगडा ; तीन अल्पवयीन मुलांसह चार ताब्यात