काय सांगता? 18 लाखांचा ‘चोरी’स गेलेला रस्ता शोधण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांचे पथक जंगलात

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

टोकडे (ता. मालेगाव) गावातून “चोरी” गेलेल्या 18 लाख रुपये किंमतीच्या रस्त्याच्या (Road) शोधासाठी जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) कार्यकारी अभियंत्यांच्या पथकाने जंगलात दिवसभर शोध घेतला…

मात्र, त्यांना हरविलेला रस्ता न सापडल्याने हतबल होऊन हे शोधपथक खाली हात माघारी फिरले. आता या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे (CBI) देण्याची मागणी विठोबा द्यानद्यान यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे.

Video : वलखेड फाट्यावर ‘द बर्निंग कार’चा थरार

मागील वर्षी मार्च महिन्यात तयार झालेला 18 लाख रुपये किंमतीचा “चोरीला” गेलेल्या रस्त्याचा आतापर्यंत शोध न लागल्याने गावकऱ्यांची चिंता वाढली आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात चोरीची रितसर तक्रार दाखल केली आहे. प्रशासनाकडून या अजब चोरी प्रकरणाचा वेळोवेळी शोध घेतले जात आहे.परंतु, हाती काहीच लागत नसल्याने रस्ता गेला कुठे? याचा गुंता वाढतच चालला आहे.

दि. 18 जानेवारी रोजी जिल्हा परिषद नाशिकचे मुख्य कार्यकारी अभियंता संजय नारखेडे, शाखा अभियंता भदाने, उप अभियंता इंगळे यांच्यासोबत आलेल्या शोध पथकाने जंगलात जाऊनही शोध घेतला. परंतु,त्यांनाही रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागले.

सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी गावातून चोरी गेलेला रस्त्या शोधून देणाऱ्यास यापूर्वी एक लाख रुपये नंतर दोन लाख रूपये व आता पाच लाखाचे बक्षीसही जाहीर केले आहे. आठ महिन्यांपासून अनेक पथकाकडून या रस्त्याचा शोधाशोध सुरू आहे.परंतु, रस्त्याचा ठावठिकाणा लागत नसल्याने प्रशासनही हतबल झाले आहे.

नाशकात चाललंय तरी काय? पुन्हा एकाचा निर्घुण खून

दीर्घ अवधी उलटूनही रस्ता प्रकरणाचा तपास जिल्हा परिषद प्रशासन, पोलीस प्रशासनाकडून लागत नसल्याचे बघत या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार आहोत, असे विठोबा द्यानद्यान यांनी सागितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *