मुंबई | Mumbai
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीची (NCB) छापेमारी सुरूच आहे. एनसीबीकडून मुंबईत वांद्रे, अंधेरी अशा वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत. यादरम्यान NCB चं एक पथक शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) घरी मन्नतवर पोहोचलं आहे.
तसेच NCB अधिकारी सुप्रसिद्ध बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री अनन्या पांडेच्या (Ananya Pandey) घरी पोहोचले आहेत. ड्रग्स प्रकरणाच्या चौकशीसाठीचे समन्स देण्यासाठी NCB चे अधिकारी अनन्या पांडे यांच्या घरी पोहोचले होते. अधिकाऱ्यांनी अनन्या पांडेच्या घरी जाऊन तिला हे समन्स दिले आहेत.
दरम्यान NCB कडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणानुसार, शाहरुख खानच्या मन्नतवर कोणताही छापा टाकण्यात आला नसून, काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी NCB चं पथक शाहरुख खानच्या घरी गेलं होतं.
तसेच ड्रग्ज प्रकरणात (Drug case) अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला आणखी एक धक्का बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं (Mumbai High Court) आर्यनच्या जामीन (Aryan Bail) अर्जावर मंगळवार, २६ ऑक्टोबर रोजी सुनावणी ठेवली आहे. त्यामुळं त्याला आणखी काही दिवस कोठडीतच राहावं लागणार आहे.