Saturday, April 26, 2025
HomeUncategorizedदोन लक्झरी बसेसचा भीषण अपघात; पाच ठार, 25 जण गंभीर

दोन लक्झरी बसेसचा भीषण अपघात; पाच ठार, 25 जण गंभीर

मलकापूर | Malkapur

अंबरनाथवरुन हिंगोलीला जाणाऱ्या लक्झरीला विरुद्ध दिशेने भरघाव आलेल्या लक्झरीने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ५ जण ठार झाले. तर २५ जण गंभीर जखमी झाले. यातील ५ गंभीर जखमींना बुलढाणा येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

- Advertisement -

राष्ट्रीय महामार्ग ६ वर मलकापूर नजीकच्या लक्ष्मी नगरातील रेल्वे उड्डाणपूलावर आज शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.  

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, हिंगोली येथील ट्रॅव्हल्स कंपनीची लक्सरी बस क्र‌. ‌एम.एच‌.०८/ ९४५८ ही अंबरनाथवरुन ४० प्रवाशांना घेऊन परतीच्या वाटेवर होती‌. आज शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास नागपूरवरुन नाशिककडे जात असलेल्या क्र.एम.एच. २७ बी.एक्स.४४६६ या बसने समोरच्या बसला चालकाच्या बाजूने चिरत पुढे गेली‌.

त्यामुळे समोरासमोर आलेल्या दोन्ही लक्झरी बसेसमध्ये भीषण अपघात झाला. त्यात हिंगोलीला परतीच्या वाटेवर असलेले ५ प्रवासी जागीच ठार झाले. तर २५ जण गंभीर जखमी झाले. त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम झाला त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.

या घटनेत गंभीर जखमींवर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ राजेश उंबरकर यांच्या नेतृत्वाखाली चमूने शर्थीचे उपचार केले. मात्र २५ जणांपैकी ५ जण डोक्यात व पोटावर गंभीर जखमा झाल्याने अत्यवस्थ झाले होते त्यांना पुढील उपचारासाठी तत्काळ बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

या घटनेची माहिती कळताच जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासणे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी देवराम गवळी, पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी, ग्रामीण पोलीस निरीक्षक फरहात मिर्झा आदींच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले.माजी नगराध्यक्ष अँड हरीश रावळ यांनी घटनास्थळी दाखल झाले होते.पोलीस अन् नागरीकांच्या संयुक्त प्रयत्नाने गंभीर जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

बिलावल

India vs Pakistan: “एकतर सिंधुचे पाणी वाहत राहील, नाहीतर भारताचे रक्त…”;...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अधिकच ताणले गेले आहेत. पाकिस्तानसाठी महत्त्वाचा असलेला सिंधू...