Wednesday, June 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : स्मशानभूमीत जादूटोण्याचा अघोरी प्रकार

Nashik News : स्मशानभूमीत जादूटोण्याचा अघोरी प्रकार

नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण

सुरगाणा | प्रतिनिधी Surgana

- Advertisement -

पिंपळसोंड येथे स्मशानात भूभीत अज्ञाताकडून जादूटोण्याचा अघोरी प्रकार केल्याचे आढळून आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
स्मशानात खड्यात आढळून आली रेड्यावर स्वार झालेली यमराजाची मुर्ती अंधश्रद्धेतून नागरिकांमध्ये भीती बरोबरच संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत खुंटविहीरचे पोलीस पाटील यादव झिरवाळ, पिंपळसोंड येथील सेवानिवृत्त पोलीस पाटील रतन खोटरे यांनी सांगितले की,दहा ते बारा दिवसापूर्वी पिंपळसोंड गावात एका इसमाचे निधन झाले होते.याच रात्री अज्ञात भगताने भोंदूबाबाने स्मशानभूमीत अंधश्रद्धेतून तांत्रिक,मांत्रिकाने स्मशानात दीड ते दोन फुटाचा खोल खड्डा करून त्यामध्ये मंत्र विधी वापरून करणी करुन रेड्यावर स्वार झालेली चिकण मातीची रंगवलेली मुर्ती,सहा मातीचे पुतळे व प्रत्येक पुतळ्याच्या तोंडाला कच्चा दो-याने बांधलेले पासपोर्ट आकाराचे स्री व पुरुषांचे फोटो तसेच कोंबडा, देशी मद्य आदी विशिष्ट वस्तू जमीनीत आढळून आल्याने गावात अंधश्रद्धेतून भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

या स्मशानातील जादूटोणा प्रकारा विरोधात ग्रामस्थांनी एकत्र येत सामुदायिक लढा उभारण्याचा संकल्प केला आहे. ग्रामस्थांनी जादूटोणा, भोंदूगीरीला, अंधश्रद्धेला बळी न पडता या सर्व तांत्रिक, मांत्रिक वस्तू स्मशानातून खोदून काढीत गावकुसा बाहेर घेऊन अग्नी दहन करुन टाकल्या आहेत.या प्रकाराने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : शेल अकाऊंट्सचे जाळे; सायबर खेळ करुन ३३...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिककरांना ऑनलाईन गुंतवणुकीच्या (Online Fraud) आणि भीतीपोटी डिजिटल अरेस्टच्या जाळ्यात ओढून कोट्यवधी रुपयांना लुटणाऱ्या सायबर गुन्हेगारांची पाळेमुळे थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर...