धुळे dhule । प्रतिनिधी
शेतकर्यांचे (farmers) पांढरे सोने (White gold) म्हटल्या जाणार्या कपाशीला (cotton) यंदा चांगला भाव (good price) असल्यामुळे त्यावर चोरट्यांची (Thieves) वक्रदृष्टी पडलेली दिसत आहे. धुळे तालुक्यातील भदाणेसह दोंडाईचातून चोरट्यांनी दोन लाखांची कपाशी लंपास (Cotton lumps) केली. याबाबत पोलिसांत गुन्हे (Crimes in Police) दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या चोरीच्या घटनांमुळे शेतकर्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
shortsightedness
धुळे तालुक्यातील भदाणे येथील ज्योतीराम जोशा कर्नर (वय 45) यांच्या गाव शिवारातील शेट गट नं. 520 च्या पत्र्याच्या शेडमधून चोरट्यांनी 1 लाख 59 हजार 250 रूपये किंमतीची 20 क्विंटल कपाशी व 20 हजारांचे दोन टायर असा एकुण 1 लाख 79 हजार 230 रूपयांचा मुद्येमाल चोरून नेला. ही घटना दि. 19 रोजी सायंकाळी 6 ते दि. 20 रोजी सकाळी 6 वाजेदरम्यान घडली. याबाबत कर्नर यांनी धुळे तालुका पोलिसात तक्रार दिली असून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक महादेव गुट्टे पुढील तपास करीत आहेत.
तसेच दुसरी चोरीची घटना दोंडाईचात घडली. शहरातील मांंडळ चौफुलीवरील केळोदे शॉपिंग सेंटरमधील दुकान फोडून चोरट्यांनी दीड क्विंटल कपाशी चोरून नेली. याबाबत शेतकरी अरूण रमेश धनर (वय 45 रा. गोपालपुरा, दोंडाईचा) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार बुधवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास तीन चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तीन गोण्यांमध्ये भरलेला एकुण दीड क्विंटल कापुस चोरून नेला. त्यांची किंमत 15 हजार रूपये लावण्यात आली आहे. याप्रकरणी तीन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास पोहेकाँ पवार करीत आहेत.
सोडावॉटर यंत्रासह सिलींडर लंपास
दोंडाईचा शहरातील शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याशेजारी असलेल्या राज सोडा सेंटरच्या टपरीतून चोरट्यांनी दोन सोडावॉटरचे यंत्र व एक सिलींडर असा मुद्येमाल लंपास केला. त्यांची किंमत 17 हजार रूपये आहे. ही चोरीची घटना दि. 19 रोजी रात्री 9 नंतर घडली. काल सकाळी ही घटना लक्षात आली. याबाबत टपरी मालक देविदास प्रभाकर भामरे (वय 57 रा. महादेवपुरा, दोंडाईचा) यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोहेकाँ प्रविण निंबाळे करीत आहेत.
मालकाची केली फसवणूक
ठरल्याप्रमाणे हप्ते न भरता ट्रक चोरीस गेल्याचे सांगत मालकाची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ट्रक मालक संजय रविंद्र बिडवे (वय 44 रा. विटभट्टी, देवपूर) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मालकीचा एमएच 18 एए 8465 क्रमाकांचा ट्रकचा नोटरीप्रमाणे सौंदा करून तिचा भगवान भिवसन चौधरी (रा. 327, विटभट्टी, देवपूर) याने अप्रामाणिकपणे वापर केला. ट्रकचे ठरल्याप्रमाणे फायनान्स कंपनीचे हप्ते न भरता ट्रक हा ताब्यात देण्यास टाळाटाळ करीत तो चोरीला गेल्याचे सांगून फसवणूक केली. पोहेकाँ जाधव तपास करीत आहेत.