Friday, June 21, 2024
Homeमुख्य बातम्याAccident News : पर्यटकांची बस १०० फूट खोल दरीत कोसळली; आठ जणांचा...

Accident News : पर्यटकांची बस १०० फूट खोल दरीत कोसळली; आठ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

तामिळनाडूतील (TamilNadu) कुन्नूर (Coonoor) येथे पर्यटकांची (Tourists) एक बस १०० फूट खोल दरीत कोसळून (Falling into a deep valley) भीषण अपघात (Terrible Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत…

Lok Sabha Election : मिशन ४५ साठी भाजपचा मेगाप्लॅन; ‘या’ विद्यमान आमदारांना उतरवणार रिंगणात

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सदर बस उटीवरून मेट्टूपालयमला (Ooty to Mettupalayam) जात होती. यावेळी बसमध्ये ५५ पर्यटक होते. पण, मारापलमजवळ येथे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस १०० फुट खोल दरीत जाऊन कोसळली. यात ८ जणांचा मृत्यू तर ३५ जण जखमी झाले आहेत. तसेच मृतांमध्ये ३ महिलांचा (Women) समावेश आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत बचावकार्याला सुरूवात केली. तसेच जखमींना पुढील उपचारासाठी कुन्नूर येथील सरकारी रूग्णालयात (Government Hospital) दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे. तर हा अपघात नेमका कसा झाला? याची चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे.

ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी सामान्यांना झटका; गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ

मृतांच्या नातेवाईकांना ८ लाखांची नुकसान भरपाई

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन (CM MK Stalin) यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ८ लाखांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. तसेच गंभीर जखमींना १ लाख तर किरकोळ जखमींना ५० हजारांची तातडीची नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Aaditya Thackeray : “यह डर अच्छा है” असे म्हणत आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंसह सरकारवर हल्लाबोल

- Advertisment -

ताज्या बातम्या