Wednesday, September 2, 2026
Homeनाशिकधबधब्याजवळील डोहात बुडून पर्यटकाचा मृत्यू

धबधब्याजवळील डोहात बुडून पर्यटकाचा मृत्यू

- Advertisement -

दहिवड | वार्ताहर Dahivad

सध्या पावसाळ्याचे दिवस असून नाशिक जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी धबधबे वाहू लागले आहेत. देवळा तालुयातील दहिवड व चिंचवे या गावांच्या सरहद्दीवरील चोरचावडीचा धबधबा पर्यटकांना आकर्षित करीतआहे. पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणी मालेगाव, नाशिक, चांदवड, धुळे, कळवण, देवळा या भागातून पर्यटक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. आज सकाळी मालेगाव येथील काही पर्यटक या ठिकाणी पर्यटनासाठी आले होते. त्यापैकी एक जणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

माझ अन्सारी शाहिद अखतर, मो. अमदान अब्दुल हुसेन, शर्जिल खान अमीर खान, मो. अनस नदीम सय्यद हे पर्यटक चोरचावडी या ठिकाणी पर्यटनासाठी आले होते. मात्र या डोहांमध्ये असलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने पर्यटनाचा आनंद घेत असलेल्या त्यातील एक जण माझ अन्सारी शाहिद अख्तर (रा. बिरादर बाग, मालेगाव) हा बुडाला. देवळा पोलिसांनी मालेगाव येथील शकील तैराकी यांच्या मदतीने त्याचा मृतदेह शोधून पाण्याबाहेर काढला.

या आधी देखील करोना काळात वडाळीभोई येथील ३ जण, मागील महिन्यात मालेगाव येथील एक जण व मागील आठ दिवसांपूर्वी मालेगाव येथील एक जण या धबधब्यात बुडून मृत्यू पावले होते. आज पुन्हा एका तरूणाचा या ठिकाणी मृत्यू झाल्याने हे ठिकाण धोकादायक पर्यटनस्थळ ठरले आहे. देवळा पोलीस स्टेशनच्या सपोनि नंदा पाटील, पो.हवा. खुरासने, शिंदे, नितीन बारहाते घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून दखल घेतली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून सर्वाधिक 123 हरकती

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकती दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. हरकती दाखल...