Friday, June 21, 2024
Homeनंदुरबारजामली येथील मतदान केंद्रावर वृक्ष पडले, वीज पडून बैल ठार

जामली येथील मतदान केंद्रावर वृक्ष पडले, वीज पडून बैल ठार

मोलगी । वार्ताहर

- Advertisement -

तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या जामली येथे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तेथील मतदान केंद्रावर मोठे वृक्ष उन्मळून पडले. सुदैवाने कुठलाही अनर्थ घडला नाही. दरम्यान भांग्रापणी येथे वीज पडून बैलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील जामली या मतदान केंद्र येथे दुपारी सुरू झालेल्या अवकाळी पावसाबरोबरच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मतदान केंद्राच्या बाहेर असलेले मोठे झाड उन्मळून मतदान केंद्रावर कोसळले. मात्र सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

स्थानिक प्रशासनाकडून तातडीने ते झाड काढून साफसफाई करण्याचे प्रयत्न करण्यात आले. दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरू झाली असता विजांच्या गडगडासह जोराचा वारा सुरू झाल्याने जामली येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील भले मोठे झाड मतदान केंद्रांवर कोसळून पडले. मात्र सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवीत हानी झाली नसल्याने पुढील मोठा अनर्थ टळलेली आहे.
दरम्यान, तालुक्यातील भांग्रापानी येथे वीज पडून बैलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

- Advertisment -

ताज्या बातम्या