Wednesday, April 30, 2025
HomeनाशिकNashik News : उड्डाण पुलावर ट्रकला आग; सुदैवाने जीवितहानी नाही

Nashik News : उड्डाण पुलावर ट्रकला आग; सुदैवाने जीवितहानी नाही

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

लेखानगर (Lekha Nagar) येथील बालभारती समोरील उड्डाण पुलावर मुंबईच्या दिशेने बटाटे घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग (Truck Fire) लागल्याची घटना आज सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. यावेळी ट्रकला आग लागल्याने उड्डाण पुलासह इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्विस रोडवर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.

- Advertisement -

तर सदर घटनेची माहिती समजताच अग्निशमन विभाग (Fire Department) व पोलिसांनी (Police) घटनास्थळी पाचारण करत अर्ध्या तासानंतर आग विझवून वाहतूक सुरळीत केली. या आगीत ट्रकमधील बटाटे जळून खाक झाले असून घटनास्थळी एक ते दोन बंब आग विझवण्यासाठी दाखल झाले होते.

Cabinet Meeting : शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक; राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक (Nashik) येथून मुंबईच्या (Mumbai) दिशेने उड्डाण पुलावरून जाणारा ट्रक क्रमांक (UP 75 AT 9393) जात असताना सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास लेखानगर भागात अचानक ट्रकच्या पाठीमागील टायर फुटले आणि काही वेळात अचानक टायरला आग लागली. आग लागल्यामुळे उड्डाण पुलासह सर्विस रोडवर देखील वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

दरम्यान, त्यानंतर अग्निशमन विभागाने तब्बल अर्धा तासानंतर आग विझविली. या घटनेत ट्रकचा चालक तसेच क्लिनर हे सुदैवाने वाचले. तर ट्रकला लागलेली आग बघण्यासाठी सर्विस रोडवर नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदी ॲक्शन मोडमध्ये! पहलगामच्या हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षेबाबत घेतला मोठा...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या अगदी एका आठवड्यानंतर, मंगळवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. यात तिन्ही दलांचे...