नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR
नंदुरबार-तळोदा (Nandurbar-Taloda) रस्त्यावर असलेल्या सुदर्शन पेट्रोल पंपाजवळ (Petrol pump) वाळू वाहतूक करणार्या ट्रकने पेट्रोलिंग करणार्या पोलीस (police) गाडीला धडक दिल्याने पोलीस निरीक्षकांसह तीन पोलीस गंभीर जखमी झाल्याची घटना आज पहाटे घडली.
आज दि.१५ रोजी पहाटे ३ ते ४ वाजेदरम्यान रात्री गस्त घालणार्या पोलीस वाहन (क्रमांक एमएच १२-एसक्यू १०४८) वर तळोदा येथून नंदुरबार येथे परत येत असतांना सुदर्शन पंट्रोलपंपजवळ नंदुरबारहुन वाका चार रस्त्याकडे जाणारी मालट्रक (क्र.एमएच१४- एफटी-५१६७) वरील चालक सचिन दशरथ शिरसाठ याने त्याच्या ताब्यातील मालट्रक रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन हयगयीने व भरधाव वेगाने ट्रक चालवून पोलीस वाहनाला जबर धडक दिली.
अवकाळीने होणारे नुकसान टाळण्यासाठी कृषि विभागाने दिल्या या मार्गदर्शक सूचना
या अपघातात पोलिस निरीक्षक राजेंद्र दगडु भावसार (नियंत्रण कक्ष नंदुरबार), पोकॉ प्रकाश परशुराम कोकणी (पोलीस मोटार वाहन विभाग नंदुरबार), पोकॉ रविद्र सुकलाल सावळे (पोलीस मुख्यालय नंदुरबार), पोकॉ रविद्र सुकलाल सावळे (पोलीस मुख्यालय नंदुरबार) यांना गंभीर दुखापत झाली.
याप्रकरणी पोकॉ रविद्र सुकलाल सावळे यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात सचिन दशरथ शिरसाठ (रा.नाशिक) याच्याविरुद्ध भा.दं.वि. कलम २७९, ३३७, ३३६, ४२७ सह मो.वा.का.क १८४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुुढील तपास सपोनि दिनेश भदाणे करीत आहेत.