Saturday, July 27, 2024
Homeशब्दगंधट्रस पूल

ट्रस पूल

– अंजली राजाध्यक्ष

ट्रस हा एक अशाप्रकारे बांधलेला पूल असतो, ज्याची प्रचंड वजन पेलण्याची क्षमता truss या पद्धतीने केली जाते. या पुलाला कॉलम वा बीम सपोर्ट नसतो. खरे तर कसलाच आधार नसतो. त्रिकोणांच्या सहाय्याने अत्यंत ताण व वजन सहन करू शकतील अशा धातूच्या त्रिकोणांपासून हा पूल बनवला जातो. त्याचे डिझाईन बनवणे सोपे व बांधणे आर्थिकदृष्ट्या परवडेल असेच आहे. हिमाचलसारख्या डोंगराळ भागात मुख्यत्वे करून हे ट्रस पूल बांधलेले दिसतात.

- Advertisement -

स्पिती व्हॅलीमधील चिचम ब्रीज हा साडेतेरा हजार फुटांवर बांधलेला आशियातील सर्वात उंच पूल मानला जातो. चिचम आणि किब्बर या दोन गावांना जोडणारा हा पूल हजार फूट खोल दरीवर बांधलेला आहे. आम्ही या पुलावरून चालून पाहिले. अनेक फोटोही घेतले. या पुलाखालील घाट हा सांबा लांबा नाल्याच्या नावाने ओळखला जातो. या पुलामुळे किब्बर ते लोसर हा प्रवास 40 किलोमीटरने कमी होतो. या पुलाखालील स्पितीचे पात्र मात्र गाळयुक्त व कोरडे भासले. अधांतरी लटकलेला हा पूल एका वेळेस मोठ्या ीींरळश्रेी चे वजन घेऊ शकतो. आमचा रिकामा टेम्पो पुलावरून जाताना ‘याचि देही याचि डोळा’ पाहिले. तंत्रज्ञानाने केलेली ही कमाल आहे. खुपसे हे पूल भारतीय जवानांची अभियांत्रिकी शाखा बांधते (इडऋ) पूल बांधताना एखाद्या मजुराचा मृत्यू झाल्यास त्या मजुराचे नाव त्या पुलास दिले जाते, हेही आम्ही तेथे ऐकले. असे काही पूल वाटेत लागलेदेखील.

- Advertisment -

ताज्या बातम्या