औरंगाबाद – aurangabad
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांचे समर्थक आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांच्या उद्धव ठाकरेंविषयी केलेल्या ट्विटमुळे (Tweet) राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. संजय शिरसाट यांनी त्यांच्या ट्विटरवर उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) व्हिडिओ (video) पोस्ट केला होता. तर, ट्विटरच्या डीपीमध्येही संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो लावला होता. मात्र, माध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो हटवून एकनाथ शिंदे यांच्या सोबतचा फोटो डीपीवर ठेवला. तर, याशिवाय पुन्हा ते ट्विट देखील डिलीट केलं.
भाजपा व शिंदे गटाच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळल्याने नाराज असलेल्या शिंदे गटाचे आ.संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असे ट्विट केले आणि ते पुन्हा शिवसेनेत परतणार का अशी एकच चर्चा सुरू झाली, त्यांनी केलेले रात्रीचे ट्विट केल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांनी तीन तासांनी डिलिट केले, तांत्रिक कारणामुळे ते ट्विट चुकून पडले असल्याचा खुलासा केला, यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता आ. अंबादास दानवे यांनी शिरसाटांना जोरदार टोला लगावला.
आ.शिरसाट हे शिंदे यांच्या बंडाळीत त्यांच्या खाद्यांला खाद्दा लावून काम केले, त्यामुळे या सरकारमध्ये आपल्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी त्यांना आशा होती, मंत्रिमंडळ विस्तारात समावेश निच्छित होणार म्हणून त्यांना तर फोन देखील आला होता, रात्रीतून त्यांचे नाव यादीतून कापल्या गेले, त्यामुळेच ते प्रचंड नाराज झाले, याच नाराजीतून त्यांनी रात्री शिवसेनेचे पक्षप्रमूख उद्धव ठाकरे यांच्या विधिमंडळातील जुना व्हिडिओ ट्विट करत उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असे ट्विट केले, त्यामुळे नाराज आ. शिरसाट पुन्हा सेनेत परतणार का अशी चर्चा सुरू झाली होती.