Wednesday, April 2, 2025
HomeनाशिकNashik News : चिमुकलीच्या पोटातून काढला दोन किलोचा ट्यूमर

Nashik News : चिमुकलीच्या पोटातून काढला दोन किलोचा ट्यूमर

नाशिक | Nashik

नामको चॅरिटेबल ट्रस्टचे (Namco Charitable Trust) अध्यक्ष सोहनलाल भंडारी व सचिव शशिकांत पारख यांच्या मार्गदर्शनाखाली नामको हॉस्पिटल (Namco Hospital) वैद्यकीय क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करत आहे. त्याचाच प्रत्यय पेठ तालुक्यातील (Peth Taluka) आदिवासी पाड्यातील एका कुटुंबाला आला आहे…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, दोन वर्षाच्या परीला (बदललेले नाव) वयाच्या सहाव्या महिन्यापासूनच पोटात दुखायचा त्रास सुरू झाला होता. तिच्या घरच्यांनी तिला अनेक दवाखान्यात दाखवले. अगदी उपचार करण्यासाठी तिच्या घरच्यांना त्यांची जनावर विकावे लागली तरी देखील तिचे निदान झाले नाही. त्यामुळे या रुग्णाला नामको रुग्णालयात येथील एक कर्मचारी पेठमध्ये भेटले व त्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांना दाखवून घ्या असे सुचवले.

यावेळी रुग्णालयात डॉ. स्वप्नील पारख यांनी परीची तपासणी केली असता तिला पोटात मोठी गाठ आहे आणि ती शस्त्रक्रियेद्वारे काढावी लागेल असे सांगितले. परंतु, पालकांकडे पैशाची काहीच तरतूद नव्हती. त्यामुळे या परिस्थितीत रुग्णालयातील सोशल वर्कर वैशाली गांगुर्डे आणि स्वाती डावरे यांनी परीसाठी चॅरिटीमधून निधी उपलब्ध केला आणि त्याद्वारे तिची शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात आली. यानंतर परीच्या पोटातून साधारणता दोन किलो वजन (पंधरा सेंटीमीटर लांब) इतकी मोठी गाठ काढण्यात आली.

दरम्यान, ही शस्त्रक्रिया डॉ. सतीश कापडणीस, डॉ.नागेश मदनुरकर, भुलतज्ञ डॉ.दिनेश बोरसे आणि डॉ. स्वप्नील पारख यांच्या टीमने केली.तर शस्त्रक्रिया पश्चात रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सिंग आणि सर्व सुविधा कर्मचाऱ्यांनी परीची काळजीपूर्वक सेवा केली आणि त्यामुळेच परी आता तिचे पुढच्या आयुष्य निरोगी जगू शकेल याबद्दल परीच्या आई-वडिलांनी डॉक्टरांचे व विशेषतः सोशल वर्कर वैशाली गांगुर्डे आणि स्वाती डावरे यांनी निधी उपलब्ध करून मदत केल्याबद्दल विशेष आभार मानले. तसेच नामको चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी व सचिव शशिकांत पारख, मेडिकल सुपेरीटेंडंट डॉ. विशाखा जहांगीरदार आणि जनरल मॅनेजर समीर तुळजापूरकर यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Waqf Bill : ‘वक्फ’ आज लोकसभेत; विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपचा ‘बिग...

0
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi वक्फ दुरुस्ती विधेयक आज, बुधवारी दुपारी १२ वाजता लोकसभेत सादर केले जाईल. व्यवसाय सल्लागार समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब...