दोंडाईचा – श. प्र. dondaicha
निमगूळ-दोंडाईचा रस्त्यावरील भोले पेट्रोल पंपाजवळ (Petrol pump) दोन दुचाकीची (bike) समोरासमोर धडक (accident) होऊन एक ठार तर तीन जण जखमी झाले. हा अपघात दि. ८ रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास झाला.
विशाल चंद्रकांत गिरी (वय ३२) रा.देवी ता.शिंदखेडा (Shindkheda) असे मयत तरुणाचे नाव आहे. निमगूळ कडून दोंडाईचाकडे बुलेट क्रमांक एम.एच.18 जे 9617 या दुचाकीने जात असताना सुदाम विठ्ठल सदाराव (वय 50) रवींद्र काळु ठाकरे (वय 40) हिरालाल सुकलाल चव्हाण (वय 40) हे दोंडाईचा कडून निमगूळकडे हिरो स्पेल्डर क्रमांक एम. एच. 39 एस 8712 या दुचाकीने जात असताना दोघांचीही समोरासमोर धडक झाल्याने भिषण अपघात घडला.
यात विशाल चंद्रकांत गिरी (वय 32) यास डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाल्याने लागलीच परिसरातील नागरिकांनी वाहनात टाकून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ तेजस जैन तपासून मृत घोषित केले. व सुदाम सदाराव, रवींद्र ठाकरे हिरालाल चव्हाण हे गंभीर जखमी असून यांच्या शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच दोंडाईचा पोलीस (police) घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी उशिरापर्यंत मोटार वाहन कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात काम सुरू होते.
visual story गौरीचा मॉर्डन लुक चर्चेत