Friday, May 24, 2024
HomeनाशिकNashik News : येत्या रविवारी भक्ती बीट्स कॉन्सर्टची अनोखी पर्वणी

Nashik News : येत्या रविवारी भक्ती बीट्स कॉन्सर्टची अनोखी पर्वणी

नाशिक | Nashik

स्पायडर मीडिया हाऊस (Spider Media House) आयोजित भक्ती बीट्स म्युझिकल लाईव्ह कॉन्सर्ट (Bhakti Beats Musical Live Concert) येत्या रविवारी (दि.२६ नोव्हेंबर) रोजी गोखले एज्युकेशनच्या प्रागंणात गुरुदक्षिणा सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. सदरील कार्यक्रम मुझोफ्रेक, कलाश्री व नादसाधना यांच्या संयुक्त विद्यमाने होत असून नाशिकमध्ये सर्वप्रथम भक्तीसंगीत हे नाविन्यपूर्ण फ्युजन स्वरूपात सादर होणार आहे…

- Advertisement -

Weather Update : राज्यातील ‘या’ भागात पुढील चार ते पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता

डॉ. आशिष रानडे व ज्ञानेश्वर कासार हे गायनाची धुरा सांभाळणार असून अनिरुद्ध बुधर आणि त्यांचे सहकारी रॉक बँडच्या माध्यमातून वाद्यांची साथसंगत देणार आहेत. आत्तापर्यंत भक्तीसंगीत हे नेहमीच्या धाटणीत ऐकले आहे. पंरतु, या कॉन्सर्टमध्ये अनोख्या पद्धतीने शब्द, सूर आणि वाद्य यांची जुगलबंदी सादर केली जाणार आहे. तसेच सदर कार्यक्रमासाठी अडावदकर ज्वेलर्स, लिनन क्लब, आयेव्होक आणि ऑप्टिकल अँड व्हिजन केअर , जय स्पोर्ट, पार्कसाईड, ज्योती वॉच हाऊस, वेल्थ ग्रोथ फायनान्स सर्विसेस, टीसीएच वर्ल्ड हॉलिडे, स्पोर्ट्स बझार, सोनी गिफ्ट्स यांचे सहकार्य लाभले आहेत. 

तसेच जास्तीत जास्त नाशिककरांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन शरद धात्रक यांनी केले आहेत. तर प्रवेश पास मिळवण्यासाठी प्रेस्टिज पॉईंट बिल्डिंग, पंजाब नॅशनल बँकेजवळ, वसंत मार्केटसमोर, कॅनडा कॉर्नर आणि ९८९००१११२० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या