दिंडोरी | प्रतिनिधी Dindori
दिंडोरी येथे भार नियमानामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी व शेतकऱ्यांनी दिंडोरीच्या वीज कंपनी कार्यालयात जाऊन बसकण मारली व अभ्यास करत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले या आंदोलनाची दखल वीज कंपनीने घेतले असून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे व भारनियमन रद्द करण्याचे आश्वासन आंदोलकांना दिले आहे.
दिंडोरी येथील जाधव वस्ती पिंगळे वस्ती बोरस्ते वस्ती हरिक महाले वस्ती येथे रात्री बिबट्यांचा वावर असतो.वीज असल्यास बिबट्याचा वावर समजून येतो मात्र वीजपुरवठा नसल्यास बिबट्यापासून धोका राहत शेतकऱ्यांना रात्री पाणी देता येत नाही आणि घराबाहेर पडता येत नाही. रोज विद्यार्थ्यांचा अभ्यास सुद्धा बुडत आहे म्हणूनच निळवंडी रस्त्यावरील येथील विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन वीज कंपनीच्या कार्यालयात जाऊन सायंकाळचा अभ्यास केला सुमारे एक तास त्यांनी वीज कंपनीचे कार्यालयात अभ्यास केला यावेळी वीजतंत्री मयूर पिंगळे यांनी विद्यार्थ्यांना दालनात बसवले.
नगरसेवक नितीन गांगुर्डे सामाजिक कार्यकर्ते लखन पिंगळ योगेश पिंगळ चंद्रकांत पाटील सुनील घुटे, विलास पिंगळ शुभम पिंगळ यांनी विद्यार्थ्यांची समस्या मांडली.वीज कंपनीचे उप अभियंता नागरे यांच्याशी संपर्क साधला विद्यार्थ्यांची व्यथा मांडली.यावेळी नागरे यांनी शेतकऱ्यांची व विद्यार्थ्यांची व्यथा वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले.
माजी आमदार धनराज महाले यांनी विद्यार्थ्यांशी भ्रमण ध्वनी द्वारे संपर्क साधला व आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. उद्या सकाळी 11 वाजता प्रांत कार्यालयावर मोर्चे नेण्याचे त्यांनी जाहीर केले.त्यानंतर वीज तंत्री मयूर पिंगळे यांनी विद्यार्थ्यांना वीज कंपनीची बाजू सांगितली व आंदोलन मागे घेण्याचे विनंती केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी अभ्यास बंद करून घराकडे प्रयाण केले.




