Tuesday, July 23, 2024
Homeनाशिकशेतजमीनीच्या वादातून महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

शेतजमीनीच्या वादातून महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

सिन्नर | वार्ताहर Sinnar

- Advertisement -

तालुक्यातील लक्ष्मणपूर (झापेवाडी) परिसरात शेतजमिनीतुन रस्ता काढल्याने त्यातून वाद निर्माण होऊन एका महिलेने सर्वांसमोर विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. शिल्पा दत्तात्रय गवांदे असे मृत महिलेचे नाव आहे.

सकाळच्या सुमारास गवांदे यांच्या शेतातुन गावच्या काही ग्रामस्थांनी पोलीस व ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांना हाताशी धरून दांडगाईने रस्ता तयार केला. याच वेळी दत्तात्रय गवांदे, त्यांच्या पत्नी शिल्पा गवांदे व मुलगी यांनी रस्ता करणार्‍यांना विरोध केला. मात्र, गवांदे यांच्या विरोधाला न जुमानता संबंधितांनी रस्ता तयार करणे सुरूच ठेवले. रस्त्याचे काम न थांबवल्याने शिल्पा गवांदे यांनी सर्वांसमोर जवळील असलेल्या विहिरीत उडी घेतली. विहिरीत पडलेल्या महिलेला वाचविण्यासाठी दत्तात्रय यांच्यासह ग्रामस्थांनी प्रयत्न केले.

मात्र, शिल्पा यांना वाचवण्यात त्यांना अपयश आले. घटनेची माहिती वार्‍यासारखी गावभर पसरल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच वावी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व इतर सेवकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने मदतीने महिलेचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी सिन्नर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या