धुळे ।dhule । प्रतिनिधी
धुळे बस स्थानकातून (Bus Station) दागिणे चोरी (stealing jewelery ) करणार्या महिलेस ( woman) शहर पोलीसांनी गजाआड (arrested) केले. संशयित महिलेकडून पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल जप्त केला असून अवघ्या 24 तासांतच गुन्ह्याची उकल करण्यात आली.
मालेगाव तालुक्यातील कजवाडी येथील रहिवासी भारती निलेश शेवाळे यांचे 25 ग्रॅम दागिने आणि साडेपाच हजारांची रोकड पर्समधून लांबविण्यात आली होती. ही घटना काल दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. चोरीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीनंतर पोलिसांनी लगेच परिसरातील सीसीटीव्ही पाहिले असता त्यात एक संशयित महिला दिसून आली.
त्यानंतर शोध पथकातील पोलिसांनी बस स्टॅण्डचा परिसर पिंजून काढला त्यावेळी ती महिला बस स्थानकाच्या आवारातील शौचालयाजवळ दिसून आली. ती पुन्हा चोरी करण्याच्या तयारीत असतांना वेळीच पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. यावेळी तिने उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांचा संशय आणखी बळावला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित महिलेचे नाव शोभा चंदन राखपसरे (55), रा. वाडी झोपडपट्टी, चाळीसगांव, ह.मु. फुट पायरी, स्टेशनच्या बाजूला मुलूंड, प. झोपडपट्टी, मुंबई असे आहे.
सदर महिलेची महिला पोलिसांकडून झडती घेतली असता तिच्या साडीच्या परकरमध्ये दागिने आणि रोकड मिळून आली. चोरीचा ऐवज हा भारती शेवाळे आणि नाशिक येथील माधुरी नंदकिशोर निकम यांचा असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. संशयित महिलेविरुद्ध पोलिसांनी भादंवि कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.