Friday, May 24, 2024
HomeनाशिकNashik Crime News : घरात घुसून महिलेची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या

Nashik Crime News : घरात घुसून महिलेची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

येथील सामनगाव एकलहरे रोडवर (Eklahare Road) राहणाऱ्या एका महिलेच्या (Woman) घरात घुसून अज्ञात हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्याराने (Sharp Weapon) वार करत त्या महिलेला जीवे ठार मारल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून खून झालेली महिला ही एका पाणीपुरी विक्रेत्याची पत्नी असल्याचे समजते…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, क्रांती बनेरिया (वय २५) रा. सामानगाव, एकलहरे रोड, नाशिकरोड, असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. सदर महिला आपल्या राहत्या घरी तीन मुले व पतीचा भाचा अभिषेक यांच्यासमवेत घरात असताना रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोर घरात घुसले व त्यांनी क्रांती बनेरिया यांच्यावर सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाल्या. तर अभिषेक याला सुद्धा मारहाण (Beating) करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असून त्याच्या मानेवर चाकूने वार करण्यात आला आहे.

दरम्यान, ही घटना नाशिकरोड पोलिसांना (Police) समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके हे आपल्या सहकार्यासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेप्रकरणी महिलेचा पती सुदाम बनेरिया यांनी नाशिकरोड पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सुदाम बनेरिया हा मुळचा मध्यप्रदेश येथील रहिवासी असून गेल्या पंधरा वर्षापासून तो सामानगाव एकलहरे रोड परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होता. सुदाम व त्याचा भाचा अभिषेक हे दोघेही पाणीपुरी विक्रेते असून सुदाम एकलहरे येथे हातगाडा लावून पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करतो. तर त्याचा भाचा रस्त्यावर फिरून पाणीपुरी विक्री करतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या